वीरेंद्र शिंदे यांची सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (दिशा)कमिटीच्या सदस्य पदी निवड


कुडाळ- सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा दिशा समितीच्या सदस्य पदी कुडाळचे माजी सरपंच वीरेंद्र सुरेशराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय केंद्र प्रस्तुत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व मा. खासदार धैरशील मोहिते पाटील यांच्या सअध्यक्षतेखाली मा.खासदार नितीन काका पाटील सदस्य तसेच सचिव म्हणून श्री . संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा काम पाहणार आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजना, मनरेगा ,जलजीवन पाणीपुरवठा, कृषी विभाग,आरोग्य शिक्षण, शिक्षण विभाग, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना, पर्यावरण विभाग, प्रदूषण विभाग, आपत्ती व्यवस्थापन, वन विभाग, पाटबंधारे विभाग, अन्न पुरवठा विभाग, क्रीडा विभाग, महसूल विभाग, सामाजिक न्याय विभाग, इत्यादीसह अनेक खात्याच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी हि समिती काम करणार आहे . या समितीमध्ये कुडाळ गावचे मा. सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वीरेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली.वीरेंद्र शिंदे यांनी वीस वर्षापासून सरपंच व सदस्य काळामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे कुडाळ गावामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणीचे काम केली आहे. त्याबद्दल त्यांना जिल्हास्तरावर अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शिफारशीनुसार त्यांची निवड करण्यात आली निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष वसंतरावजी मानकुमरे जिल्हा बँकेचे संचालक श्री.ज्ञानदेवजी रांजणे जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री जयदीप शिंदे जावली तालुका मा. सभापती सुहास गिरी तसेच जावली तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.