युनोस्को च्या यादीत गडकोटांचा समावेश करून जगाने छत्रपतींचा सन्मान केला – संदीप परामणे, “भाजपा पूर्व मंडलाच्या वतीने आनंद उत्सव ” समीर आतार यांचाही वाढदिवसा निमित्त गौरव


युनोस्को च्या यादीत गडकोटांचा समावेश करून जगाने छत्रपतींचा सन्मान केला – संदीप परामने भाजपा पूर्व मंडलाच्या वतीने आनंद उत्सव समीर आता यांचाही वाढदिवसानिमित्त गौरव सूर्यकांत जोशी कुडाळ – युनेस्कोच्या जागतीक वारसा यादीत 12 गडकिल्यांचा समावेश करणे ही बाब प्रत्येक भारतीया साठी आणि मराठी माणसासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे, या यादीत गडकोटांचा समावेश करून जगाने छत्रपतींचा सन्मान केला असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे पूर्व मंडल अध्यक्ष संदीप परामणे यांनी केले. युनोस्को च्या जागतिक वारसा यादीत छत्रपतींच्या बारा गडकोटांचा समावेश झाल्याबद्दल शासनाचे आभार आणि आनंदोत्सव भारतीय जनता पक्षाच्या कुडाळ कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचेही अनावरण करण्यात आले.यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निष्ठावंत मावळे समीर आतार यांचा वाढदिवसानिमित्त गौरव करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या विविध मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.