जावलीत आज दोन जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह;
एकूण १३८,बळी ९,मुक्त ७४,अँक्टिव्ह ५५
सूर्यकांत जोशी कुडाळ – सोमवारी रात्री उशीरा आलेल्या अहवालात जावली तालुक्यातील रांजणी आखाडे वस्ती येथील १, व कुसुंबी येथील १ अशा दोन जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवानराव मोहिते यांनी दिली आहे.
बेशिस्तांना भरारी पथकाचा दणका
जावली तालुक्यात सोमवारी मेढा, करहर, कुडाळ,सायगांव, केळघर, आनेवाडी या मोठ्या गावातील बाजारपेठांसह अनेक गावात कारवाईचा दणका दिला. मास्क नसणाराना पाचशे रूपये तर सोशल डिस्टेंसिंग न पाळणार्या दुकानदाराना एक हजार रुपये दंड आकारण्यात आला.त्यामुळे काही काळ तरी या नियमांचे पालन लोकांनी केल्याचे दिसून आले.या कारवाईत सातत्य राहील्यास लोकांना चांगली शिस्त लागेल अशी अपेक्षा आहे.