जावलीतालुक्यासाठी बुधवार ठरला घातवार

जावलीतालुक्यासाठी बुधवार ठरला घातवार
एकाच दिवसात दोन कोरोना बाधितांचा बळी ; मात्र ९ कोरोना मुक्त झाल्याचा दिलासा
एकूण १३९,बळी ११ ,मुक्त ८३ ,अँक्टिव्ह ४५
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यासाठी बुधवार घात वारच ठरला.पुनवडी येथील ६० वर्षे वयाचा पुरुष व आखाडे वस्ती – कुसुंबी येथील कालच पाँसिटीव्ह अहवाल आलेल्या ३५ वर्षे वयाचा पुरुष अशा दोन कोरोना बाधितांचा बळी गेला आहे.तर आज सकाळच्या अहवालात कास येथील ३८ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे. रामवाडी येथील ९ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. अशीमाहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे .
दरम्यान जावली तालुक्यातील कोरोनाचा हाँटस्पाँट ठरलेल्या रामवाडी येथील 48, 26, 22, 40 व 18 वर्षीय महिला, 33, 30, 16 व 38 वर्षीय पुरुष व 1 वर्षाचा बालक यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. या गावात तब्बल ३३ जण कोरोना बाधित झाले होते. आरोग्य विभाग, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी युद्धपातळीवर प्रयत्न करुन कोरोनाला रोखण्यात यश मिळवले.
दरम्यान जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार म्हाते खूर्दया गावाचे कन्टेमेंट झोन चे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर पुनवडी, रांजणी व कुसुंबी या गावात कोरोना रूग्ण आढळल्याने कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्याचे आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केले आहेत.
एकूणच कोरोनाचा वाढता धोका ध्यानात घेऊन जनतेने अधिक सतर्क रहावे व नियमांचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी केले आहे.