जावलीत आज आणखी आठ कोरोना रुग्णांची भर

जावलीत कोरोनाचा विळखा अधिक घट्ट
आज आणखी आठ रुग्णांची भर
सूर्यकांत जोशी कुडाळ -दि.११; जावली तालुक्यात पुनवडी येथील आणखी आठ जणांचा अहवाल आज रात्री कोरोना पाँसिटीव्ह आला आहे. यापूर्वी पुनवडी येथे नऊ रुग्ण आढळले असून एकूण १७ कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण झाले आहेत . हे गाव आता कोरोनाचा हाँटस्पाँट बनले आहे.
जावली तालुक्यात शनिवार अखेर एकूण कोरोना पाँसिटीव्ह १६६,बळी११,मुक्त ९४,अँक्टिव्ह ५९ तर धोंडेवाडी येथील दोघांचे अहवाल पुन्हा पाँसिटीव्ह आले आहेत स्थिती आहे.अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
जावलीतील सरताळे गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील सरताळे येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने या गावाला जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार सरताळे या गावाला प्रतिबंधित क्षेत्राचे (कन्टेमेंट झोन )निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
रविवार पासून आठ दिवसांसाठी कुडाळ बाजारपेठ बंद
जावली तालुक्यातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या व कुडाळच्या सीमेलगत तीन किलोमीटरवर असणाऱ्या सरताळे येथे शुक्रवारी कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दि.१२/७/२० ते १९/७/२० पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कुडाळ बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थ व व्यापारी यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.