Skip to content

जावलीत आज आठ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह

बातमी शेयर करा :-

पुनवडीतील ७८ जणांचे कोरोना अहवाल पाच दिवसां पासून रखडले. जावलीत आज सात जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ,दापवडी ६, सायगांव २

सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जिल्ह्यात कोरोनाचे हाँटस्पाँट ठरलेल्या जावली तालुक्यातील पुनवडी येथील ७८ जणांचे कोरोना अहवाल पाच दिवसांनंतरही प्राप्त नाहीत. पुनवडीची साखळी तोडण्यासाठी तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाने जीव धोक्यात घालून युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यामुळे आज पुनवडीची परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आली आहे. असे असतानाच या गावातील ७८ संशयितांच्या स्वाबचे अहवाल पाच दिवस झाले तरीही मिळालेले नाहीत. हे स्वाब पुण्यातील लँबला पाठवण्यात आले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना माहिती देण्यात आली आहे. तसेच सदर सर्व संशयित होमक्वारंटाईन आहेत त्यामुळे धोका नाही. अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली आहे.

जावली तालुक्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता ३४८ झाला आहे.

         दरम्यान गुरूवारी ४७ संशयितांचे स्वाब तपासणी साठी पाठवण्यात आले होते पैकी दापवडी येथील सहा तर सायगांव येथील दोन जणांचे अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आले आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे. 

         पूर्वीच्या एकूण ८८ लोकांच्या स्वाबचे अहवाल प्रतिक्षेत आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली आहे.

दापवडी व सायगांव बनले हाँटस्पाँट

   एकीकडे पुनवडीची साखळी आटोक्यात येत असताना आता सायगांव आणि दापवडी मध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे.सायगांव वदापवडी येथे लोकांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

बाजारपेठांत गर्दी ,लोकांना गांभीर्य नाहीच; सोशल डिस्टेन्सींगचा फज्जा

       केवळ सकाळी ९  ते दुपारी २ यावेळेतच लोकांना खरेदी विक्री करण्याचे बंधन असल्याने यावेळेत बाजारपेठांत तुडुंब गर्दी होत असून सोशलडिसटेंसिगचा पूर्ण फज्जा उडाला आहे. ही गर्दी एक प्रकारे कोरोना संसर्गाला आमंत्रण देत असून लोकांनाही  याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.

 सायगांव मध्ये ग्रामस्थांकडुन नियमांचे काटेकोर पालन – अजित आपटे

       सायगांव ग्रामस्थ संभाव्य धोका टाळण्यासाठी पूर्णपणे खबरदारी घेत आहेत.लोक अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर येत नाहीत. लोकांच्या स्वयंशिस्तीमुळे कोरोनाला लवकरच सायगांव मधून हद्दपार केले जाईल असा विश्वास सरपंच अजित आपटे यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!