Skip to content

जावलीत आज तेरा कोरोना रुग्णांची भर ;

बातमी शेयर करा :-

जावलीत  आज तेरा कोरोना रुग्णांची भर  ;

     पुनवडी १२, दुदुस्करवाडी १ 

सूर्यकांत जोशी कुडाळजावली तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा ३६१ वर पोहचला आहे. बळींची संख्या १२ आहे. आज  ३०  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण २६४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर तालुक्यातील सध्या ८५ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. तालुक्याचा रिकव्हरी रेट ७३.१३,   म्रुत्यु दर ३.३२,व अँक्टिव्ह रुग्ण  २३.५५ आहेत.

        जावली तालुक्यात आज तेरा जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये पुनवडी येथील  गेल्या सात दिवसांपासून ७८ जणांच्या रखडलेल्या अहवालातील तेरा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. हे सर्व संशयित होमक्वारंटाईन व आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली होते. तर दुदुस्करवाडी येथील एकाचा अहवाल कोरोना बाधित आला असून आज एकूण तेरा जणांची भर पडली आहे. अजुन ७८ लोकांचे स्वाब शनिवारी  पुणे येथील लँबला तपासणी साठी पाठवले आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते यांनी दिली आहे.

    अत्यावश्यक सेवाच फक्त सुरू

 दरम्यान सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत अत्यावश्यक सेवा  सुरू राहणार असून अन्य सर्व आस्थापना दि. ३१  पर्यंत बंदच राहतील असा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारीत केला आहे.

         रविवारी जिल्ह्यातील लाँकडाऊन संपल्यावर सर्व दुकाने सुरू होणे अपेक्षित होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहतील असा आदेश दिल्याने अनेक व्यावसायिक अडचणीत आले आहेत. गेल्या पाच महिन्यातील सततच्या लाँकडाऊन मुळे केवळ व्यवसायांवर उपजिविका असणाऱ्या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशाचा पुनर्विचार करावा. तसेच बाजार पेठेतील गर्दी टाळण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!