जावलीत आज कोरोनाचा १४ वा बळी

जावलीत आज कोरोनाचा १४ वा बळी
१ पाँझिटीव्ह ; १३ डिस्चार्ज
एकूण ३८५ , बळी १४, डिस्चार्ज ३१७, अँक्टिव्ह ५५
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील सायगांव येथील ७० वर्षीय कोरोना बाधिताचा उपचारा दरम्यान म्रुत्यु झाला आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.जावली तालुक्यात कोरोना बळींची संख्या आता चौदावर पोहचली असून सलग दुसर्या दिवशी कोरोनाने बळी घेतल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज खर्शीबारामुरे येथील ५५ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे. सदर इसम पुण्याहुन आलेला आहे. दरम्यान तालुक्यातील आज ४५ निकट सहवासितांचे स्वाब घेण्यात आले आहेत. यामध्ये दुदुस्करवाडी येथील ३५ जणांचा समावेश आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.भगवान मोहिते यांनी दिली आहे.
रामवाडीत अंत्यविधीत ३२ बाधित झाले होते. तर पुनवडीच्या लग्नाने १६५ चा आकडा गाठला होता. तर आता सायगांव येथील वाढदिवसाच्या पार्टीमुळे दुदुस्करवाडी येथील आज पर्यंत १९ जण बाधित झाले आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.लोकांनी यातून बोध घेण्याची गरज असून भावनांना आवर घालण्याची आवश्यकता आहे.शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन कोरोनाला तालुक्यातुन हद्दपार केले पाहिजे.
जावली तालुक्यातील निपाणी मुरा या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शरदपाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी डाँँ. भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवालानुसार निपाणी मुरा या गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केले आहेत.