Skip to content

आज आणखी चार जणांचा कोरोना पाँझिटीव्ह अहवाल

बातमी शेयर करा :-

कुडाळमधील आज आणखी  चार जणांचा कोरोना पाँझिटीव्ह अहवाल

एकूण ४५३ , बळी १५ ,  डिस्चार्ज ३६४ , अँक्टिव्ह ७६

         कुडाळ एकूण – ९

 जावलीत आज  १७ डिस्चार्ज

 सूर्यकांत जोशी कुडाळ -जावली तालुक्यात गेल्या दोन दिवसात कुडाळ येथे आढळलेल्या कोरोना बाधितांच्या निकट सहवासातील ६१ लोकांची आज अँटिजेन टेस्ट घेण्यात आली पैकी ६५ व २१ वर्षे पुरुष व  ३०  व  ६५ वर्षै महिला अशा चार जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.तसेच दुदुस्करवाडी येथील सतरा जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली.

                कुडाळ मधील एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता  ९ वर पोहचला आहे.तर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी एकाचा अहवाल कोरोना बाधित असल्याची चर्चा आहे. परंतु याबाबत आरोग्य विभागाकडे अद्याप अधिक्रत माहिती उपलब्ध नाही.

        कोरोना महामारी सुरू झाल्या पासून गेले चार महिने कोरोनाला दूर ठेवणार्या कुडाळ मध्ये २ आँगष्ट ला कोरोना दाखल झाला.सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचा कोरोना बाधित आला होता. त्यानंतर त्यांच्या निकट सहवासित चार जणांचा अहवाल कोरोना बाधित आला होता. यामध्ये लहान मुलांसह एक सलून व्यावसायिक असल्याने खळबळ माजली होती. परंतु आज तब्बल एकसष्ठ लोकांच्या अँटिजेन टेस्ट पैकी चारजण पाँझिटीव्ह निघाल्याने अन्य संशयितांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

          कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर व त्याचे सहकारी परिस्थिती वर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

*उद्यापासून कुडाळची बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद*

*व्यापारी वर्गाचा निर्णय जाहीर*

       कुडाळ ता,जावळी येथे दिनांक 2 ऑगस्ट 2020 रोजी पासून कोरोना चे रुग्ण आढळत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कुडाळ येथील बाजारपेठेतील व्यापारी वर्गाच्या वतीने आज घेण्यात आलेल्या सामूहिक निर्णयानुसार, कुडाळ गावची बाजारपेठ उद्या *गुरुवार ता.६ पासून रविवार ता.९ ऑगस्ट २०२० पर्यंत* सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच येत्या ४ दिवसातील पुढील परिस्थिती नुसार पुढील योग्य तो निर्णय सर्वानुमते घेण्यात येईल..

        गावातील वैदयकिय सेवा व मेडिकल दुकाने तसेच बँकिंग सेवा नियमितपणे सुरू राहणार आहेत.

कन्टेंमेंट झोन मधील लोकांनी नियम पाळावे – तहसीलदार

      आज कुडाळ येथील कन्टेंमेंट झोन वाढवण्यात येणार आहे. तसेच कन्टेंमेंट झोन मधील लोकांनी गांभीर्याने व काटेकोर पणे नियमांचे पालन करावे .असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी केले आहे. 

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!