जावलीत कोरोनाचा १९ वा बळी ; दोन दिवसात तब्बल ३३ रुग्णांची भर

1
1

जावलीत कोरोनाचा १९ वा बळी

दोन दिवसात तब्बल ३३ रुग्णांची भर 

         ९ जणांना डिस्चार्ज

एकूण – ५३५, बळी १९, डिस्चार्ज ४३८, अँक्टिव्ह ७८

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील सरताळे येथील  आज  ५५ वर्षीय अंगणवाडी सेविकेचा कोरोनाने बळी घेतला. रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात तब्बल चौदा जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या मध्ये   मोरघर ७,मेढा ४,पवारवाडी २,महू १   यांचा समावेश आहे.तर आज सोमवारच्या अहवालात  १९  जणांचा अहवाल कोरोना बाधित आला यामध्ये मोरघर ११,महिगाव १,बीभवी  १,गांजे १,मेढा  २, सरताळे १  (मृत्यू ),दरे  बु .१,कुडाळ  १,एकूण १९ अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

      दोन दिवसात अकरा जणांना डिस्चार्ज  मिळाला आहे.

कुडाळ येथील २३ पैकी  तीन जण बाहेरील रहिवासी आहेत. उर्वरीत वीस पैकी अठरा जण कोरोना वर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत. एकाचा बळी गेला आहे . आज खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकाचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.

  जावली पंचायत समिती आरोग्य विभागाच्या माध्यमातून आज सोमवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या अहवाला नुसार प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय कोरोना बाबतची आकडेवारी पुढील प्रमाणे.केळघर – एकूण २१०, डिस्चार्ज १८७, बळी ५,अँक्टिव्ह १८,कुडाळ – एकूण ९७, डिस्चार्ज ८५, बळी ५ , अँक्टिव्ह ७.कुसुंबी – एकूण १७ ,डिस्चार्ज १४ ,बळी २,अँक्टिव्ह १,  सायगांव  एकूण १५७, डिस्चार्ज ११९ , बळी ५ , अँक्टिव्ह ३३, बामणोली – एकूण ३४ , डिस्चार्ज ३३ ,बळी १  , अँक्टिव्ह ०.

 जावली तालुका एकूण ५१५, डिस्चार्ज ४३८ , बळी १८ ,  अँक्टिव्ह ५९.

जावलीतील गांजे गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला

            जावली तालुक्यातील गांजे येथील देशमुख आळी  येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार गांजे या गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे. या गावाला महिन्यात दुसर्यांदा कन्टेंमेंट चे निर्बंध लागले आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here