जवळवाडी येथे कोरोना योध्यांच्या हस्ते ध्वजारोहण


कोरोना योध्यांचे केले ग्रामस्थांनी अनोखे स्वागत.
जवळवाडी ता.जावली येथे जि.प. शाळेमधे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कोरोनाच्या काळात लोकांच्या सेवेत असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील कोरोना योध्दा श्री विनोद जवळ व सी.आर.पी. एफ जवान श्री विनायक जवळ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जवळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने
सातत्याने अभिनव उपक्रम राबविले जात असून खरंतर ध्वजारोहणाचा मान सरपंच सौ वर्षा जवळ यांचा असूनही त्यांनी सहकार्यांसोबत चर्चा करून हा सन्मान यावर्षी कोरोना काळात दिवस रात्र झगडणार्या कोरोना योध्यांना देण्याचा निर्णय घेतला.
सद्या कोरोनाच्या काळात दिवस-रात्र समाजाच्या सेवेत असलेले गावातील आरोग्य सेवक-कर्मचारी,आशा सेविका, अंगणवाडी सेविका- मदतनीस,भारतीय जवान,पोलिस बांधव, ग्रामसेवक, शिपाई या सर्वांचे सकाळी ८वाजता गावच्या वेशीवर आगमन होताच ग्रामस्थ,महिला,युवक विद्यार्थी यांनी घराबाहेर दुतर्फा उभे रहावून टाळ्यांच्या गजरात या सर्व कोरोना योध्यांचे अनोखे स्वागत केले.
ध्वजारोहण कोरोना योध्दा महाराष्ट्र पोलिस श्री विनोद जवळ व भारतीय जवान श्री विनायक जवळ यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.वर्षा जवळ व उपसरपंच श्री शंकरराव जवळ यांचे हस्ते ध्वजस्तंभाचे पुजन करण्यात आले.
यावेळी भैरवनाथ तरूण मंडळाचे अध्यक्ष श्री सदाशिव जवळ, ग्रामपंचायत सदस्या गिताताई लोखंडे,राजेंद्र जवळ,शांताबाई जवळ व अनेक जेष्ठ ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री महादेव भिसे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर श्री शांताराम ओंबळे यांनी आभार मानले.