Skip to content

कुडाळची श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर यात्रा उत्साहात संपन्न

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील. कुडाळ येथील श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर यात्रा उत्साहात संपन्न झाली. हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर यांच्या नावानं चांगभले च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

बुधवारी पहाटेपासूनच भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे श्रीना दंडस्थान, लोटांगण, पुरणपोळीचा नैवेद्य भाविकांनी अर्पण केला. सायंकाळी पाच वाजता देवाच्या मानाच्या शासन काट्यांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. परंपरेप्रमाणे वाई व बावधन येथून मानाच्या काठ्या आल्या होत्या. त्याचबरोबर स्थानिक सजवून सहभागी झाल्या होत्या. रात्री अकरा वाजता छबिन्याला सुरुवात झाली. परिसरातील सुमारे 200 च्या वर ढोल वादक सहभागी झाले होते. यावेळी भाविकांनी श्रींच्या वर चांगभले च्या गजरात गुलालाची उधळण केली.

गुरुवारी घरोघर पाहुण्यांसाठी खास मेजवानी ठेवण्यात आली होती. तसेच मनोरंजनासाठी खास लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा फड चांगलाच रंगला होता. यात्रेनिमित्त आलेली विविध प्रकारची दुकाने, वाडे मिकीमाऊस यासारखे मुलांची खेळ साधने यात्रेचे खास आकर्षण होते. यात्रा कमिटीने भाविकांच्या सोयीसाठी सुयोग्य असे नियोजन केले होते. मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!