Skip to content

जावली तहसीलदार यांच्या टीमने मोटार सायकल रॅली द्वारे केली घर तिरंगा जनजागृती

बातमी शेयर करा :-

मेढा पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

सातारा दि.
प्रतिनिधी
मोहन जगताप
यांजकडुन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव
साजरा करण्यासाठी शासनाच्यावतीने प्रत्येक घरी प्रत्येक ठिकाणी तिरंगा झेंडा फडकविण्यात येणार असून 75 वर्ष पूर्ण झाल्याने हर घर तिरंगा दि 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत फडकविण्यात येणार असून
यानिमित्ताने जावली तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ व नायब तहसीलदार संजयजी बैलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सहभागाने आज भणंग ते मेढा या परिसरातून व तालुक्यातील विविध गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामसेवक व तलाठी यांच्या सजातून गत सप्ताहांत जनजागृतीसाठी भव्य मोटर सायकल रॅली रक्तदान शिबीर व विविध माध्यमातुन जनजागृती करण्यात आली.
भणंग ता.जावली या ठिकाणाहून शासकीय अधिकारी व कर्मचारी व ग्रामस्थांनी मोटर सायकल रॅलीस तहसीलदार राजेंद्र पोळ व नायब तहसीलदार संजयजी बैलकर यांनी झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ केला.
यावेळी मेढ़ा पोलीस स्टेशनच्या वतीने खास अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने तालुक्यातील पोलीस पाटील व सर्व शासकीय व निमशासकीय 100 ग्रामस्थांनी रक्तदान केले.
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती अंगणवाडय़ा व जिल्हा परिषदेच्या शाळा, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील प्रमुखांच्या वतीने जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मेढा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार व गट विकास अधिकारी काळे यांनी दिली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
” हर घर तिरंगा ” या जनजागृतीसाठी साठी तहसीलदार कार्यालयासह मेढा पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली राहून गायकवाड, अमोल पवार, उदय शिंदे यांनी मोटार सायकल रॅलीचे उत्कृष्ट व शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील मेढा नगर पंचायत, सामाजिक वनीकरण, वनविभाग, कृषि अधिकारी, ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य विभाग, पंचायत समितीतील सर्व विभागाच्या सामाजिक व सहकारी संस्था यांनी सहभाग घेतला होता……

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!