Skip to content

आनेवाडी टोल नाक्यावर स्थानिकांना टोल माफी द्या – स्थानिकांची  मागणी

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी  कुडाळ – सातारा जिल्ह्यातील जावली  तालुका हद्दीत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर स्थानिक वाहनधारकांना  टोल साठी पुन्हा अडवणूक  केली जात आहे. मासिक पास काढण्याची  सक्ती केली जात आहे. टोलनाका प्रशासनाच्या  या अडमुठे  धोरणाला  तातडीने  लगाम  घालावा  अन्यथा  स्थानिक वाहन धारक  टोलनाक्यावर तीव्र आंदोलन करतील असे निवेदन परिसरातील  ग्रामपंचायत्तीच्या वतीने पोलीस ठाण्याचे  अधिकारी  रमेश गरजे यांना देण्यात आले आहे.

             टोल नाक्यावरील स्थानिकांची  अडवणूक  त्वरित थांबवावी  अन्यथा  2 एप्रिल रोजी टोलनाक्यावर भव्य  मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती  निर्माण झाल्यास टोलनाका प्रशासन  जबाबदार  राहिलं असा इशारा  देण्यात आला आहे.

                   राष्ट्रीय महामार्गांवर आनेवाडी येथे गेल्या पंधरा वर्षांपासून टोलनाका सुरु करण्यात आला आहे. या महामार्गामुळे स्थानिकांनी आपल्या अनमोल जमिनी देऊन योगदान दिले आहे. तसेच  स्थानिकांना दैनंदिन व्यवहारासाठी या टोलनाक्याच्या अलीकडे  पलीकडे अगदी  दोन पाच  किलोमीटर  अंतरासाठी आपल्या वाहनातून ये जा करावे  लागते.त्यासाठी टोल देणे किंवा मासिक पासाचा नाहक बुर्दंड सहन  होणारा नाही. याबाबत सुरुवातीपासून स्थानिकांनी विरोध केला आहे. आंदोलणे  झाली आहेत. अनेकदा  टोल देण्यावरून स्थानिक आणि टोलनाका कर्मचारी आणि प्रशासनाची  वादावादी झाली आहे. नियमित  होणाऱ्या वादावादी मुळे  वाहतूक कोंडी होऊ नये जावली, वाई आणि सातारा तालुक्यातील टोल नाक्या पासून 25 किमी अंतरातील वाहने  टोल शिवाय सोडली  जात होती. परंतु  आता पुन्हा स्थानिक वाहन धारकांना मासिक पास काढण्यासाठी सक्ती केली जात आहे.नियमानुसार स्थानिकांसाठी महामार्गशिवाय पर्यायी सर्व्हिस रोड देणे आवश्यक आहे.

           टोलनाका प्रशासनाने यांची तातडीने  दखल घेऊन स्थानिकांना मासिक पास अथवा  टोल देण्यासाठी करण्यात येणारी अडवणूक  थांबवावी असे आवाहन या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

आनेवाडी टोल नाक्यावर स्थानिकांना टोल माफी द्या – स्थानिकांची  मागणी

सूर्यकांत जोशी  कुडाळ – सातारा जिल्ह्यातील जावली  तालुका हद्दीत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर स्थानिक वाहनधारकांना  टोल साठी पुन्हा अडवणूक  केली जात आहे. मासिक पास काढण्याची  सक्ती केली जात आहे. टोलनाका प्रशासनाच्या  या अडमुठे  धोरणाला  तातडीने  लगाम  घालावा  अन्यथा  स्थानिक वाहन धारक  टोलनाक्यावर तीव्र आंदोलन करतील असे निवेदन परिसरातील  ग्रामपंचायत्तीच्या वतीने पोलीस ठाण्याचे  अधिकारी  रमेश  भरजे यांना देण्यात आले आहे.

             टोल नाक्यावरील स्थानिकांची  अडवणूक  त्वरित थांबवावी  अन्यथा  2 एप्रिल रोजी टोलनाक्यावर भव्य  मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती  निर्माण झाल्यास टोलनाका प्रशासन  जबाबदार  राहिलं असा इशारा  देण्यात आला आहे.

                   राष्ट्रीय महामार्गांवर आनेवाडी येथे गेल्या पंधरा वर्षांपासून टोलनाका सुरु करण्यात आला आहे. या महामार्गामुळे स्थानिकांनी आपल्या अनमोल जमिनी देऊन योगदान दिले आहे. तसेच  स्थानिकांना दैनंदिन व्यवहारासाठी या टोलनाक्याच्या अलीकडे  पलीकडे अगदी  दोन पाच  किलोमीटर  अंतरासाठी आपल्या वाहनातून ये जा करावे  लागते.त्यासाठी टोल देणे किंवा मासिक पासाचा नाहक बुर्दंड सहन  होणारा नाही. याबाबत सुरुवातीपासून स्थानिकांनी विरोध केला आहे. आंदोलणे  झाली आहेत. अनेकदा  टोल देण्यावरून स्थानिक आणि टोलनाका कर्मचारी आणि प्रशासनाची  वादावादी झाली आहे. नियमित  होणाऱ्या वादावादी मुळे  वाहतूक कोंडी होऊ नये जावली, वाई आणि सातारा तालुक्यातील टोल नाक्या पासून 25 किमी अंतरातील वाहने  टोल शिवाय सोडली  जात होती. परंतु  आता पुन्हा स्थानिक वाहन धारकांना मासिक पास काढण्यासाठी सक्ती केली जात आहे.नियमानुसार स्थानिकांसाठी महामार्गशिवाय पर्यायी सर्व्हिस रोड देणे आवश्यक आहे.

           टोलनाका प्रशासनाने यांची तातडीने  दखल घेऊन स्थानिकांना मासिक पास अथवा  टोल देण्यासाठी करण्यात येणारी अडवणूक  थांबवावी असे आवाहन या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!