कुडाळच्या पिंपळबन उपक्रमाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून प्रशंसा

:कुडाळच्या विविध विकास कामाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ येथे लोक सहभागातून साकारलेल्या पिंपळबन उपक्रमाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्त कंठाणे प्रशंसा केली. पर्यावरण पूरक असणारा हा उपक्रम राज्यस्तरावर राबवता यावा यासाठी कृती आराखडा बनवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिले आहेत.व कुडाळ गावातील विविध विकास कामां विषयी मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुडाळ ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे सातारा जिल्हा दौऱ्यासाठी आले होते. यावेळी कुडाळ गावातील विविध विकासकामा संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले .सोबतच कुडाळ येथे लोकसहभागातुन साकारलेल्या *आपलं पिंपळबन व बालोद्यान याबाबत माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील अबाल वृद्धांचे जीवन आनंददायी व आरोग्यदायी व्हावे यासाठी
*आपलं पिंपळबन उपक्रम राज्यस्तरावर राबवणे बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुडाळच्या निसर्ग प्रेमी जनतेच्या वतीने साकडे घालण्यात आले.
यावेळी कुडाळ येथील पिंपळबन समितीचे अध्यक्ष महेश पवार ,कुडाळ गावचे माजी सरपंच विरेंद्रजी शिंदे ,उपसरपंच सोमनाथ कदम तसेच सदस्य विशाल मदने व ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्यापुढे *गाव तिथे पिंपळबन* ही संकल्पना राबवण्यासाठी तसेच ही योजना शासनाने दत्तक योजना म्हणून जाहीर करावी . देशी झाडांचे वृक्षारोपण व संगोपन या कामासाठी गावोगावी विविध फंड उपलब्ध करून द्यावेत अशा विविध मागण्या केली.
मा. मुख्यमंत्री हे निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्व असून त्यांना पर्यावरण संदर्भात आवड असल्याने त्यांनी ही योजना खरोखर निसर्गाच्या दृष्टीने व मानवी जीवनाच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे सांगून ही योजना संपूर्ण राज्यस्तरावर कशी राबवता येईल याचा नियोजित आराखडा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना सादर करण्याविषयी सूचना केल्या. लोकसहभागातून सुरू असलेल्या पिंपळबनच्या *जावळी पॅटर्न* ची गरज निश्चितच संपूर्ण राज्याला आहे ,त्यास सहकार्य मिळेल.असे सांगितले.
त्याचबरोबर पुलस्ती मंदिर ते सातारा मार्ग रस्ता व संरक्षण भिंत, बोडरे वस्ती येथे संरक्षण भिंत , ब्राह्मण शाही संरक्षक भिंत पिण्याच्या पाण्याच्या विहिरी शेजारी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, गावांतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण अशा विविध विकासकामांच्या संदर्भात विकास कामे निधी संदर्भात बोलणी केली.
