स्व. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले जयंती निमित्त सोनगाव येथे तुलसी रामायण सप्ताहाचा शुभारंभ

रामायणातील बंधू प्रेमाचा आदर्श घेणे आवश्यक -ह. भ. प. ढोक.
कुडाळ – रामायणात प्रभू रामचंद्रप्रति त्यांचे सावत्र भाऊ असणाऱ्या लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या बंधू प्रेमाचा आदर्श समाजाने घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन ह. भ. प. ढोक महाराज नागपूर कर यांनी केले.
स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले (भाऊसाहेब महाराज) यांचे जयंती निमित्त श्री तुलसी रामायण सप्ताहाचा शुभारंभ विद्यानगर सोनगाव ता. जावली येथे आ. शिवेंदरसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यावेळी व्याख्यानाच्या प्रस्तावानेत ह.भ. प. ढोक महाराज नागपूरकर यांनी उपस्थित श्रोत्यांना हा उपदेश केला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, ह. भ. प. प्रवीण महाराज शेलार, जावली बाजार समितीचे विद्यमान संचालक राजेंद्र भिलारे, मालोजीराव शिंदे,जयदीप शिंदे, मच्छिन्द्र मुळीक, संदीप परामणे उपस्थित होते.
जावली तालुक्यातील श्री धुंदीबाबा विद्यालय, विद्यानगर येथे मैदानावर सुशोभित भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. श्रोत्यांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.उपस्थिताना व्याख्यान जवळून पाहता यावे यासाठी भव्य डिजिटल स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत. आ. शिवेंद्रसिह राजे मित्र समूह,कार्यक्रमासाठी मंडप उभारणी पूजन नुकतेच करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे मित्र समूह,,श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, श्री विश्वंभर बाबा वारकरी संस्था , यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.