कुडाळ येथे गुरुवारी मोफत अस्थी रोग तपासणी शिबीर

संचेती हॉस्पटल पुणे चे तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणी करणार
कुडाळ – कर्तव्य सोशल ग्रुप सातारा व प्रतापगड सहकारी साखर कारखाना चेअरमन सौरभ शिंदे बाबा मित्र परिवार यांच्या माध्यमातून व सुप्रसिद्ध संचेती हॉस्पिटल पुणे यांच्या सहयोगाने गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ. वेदांतीका राजें भोसले व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे बाबा यांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
या शिबिरात प्रामुख्याने हाडांचे आजार, सांधे दुखी, कंबर दुखी, गुडगे दुखी यासारख्या आजाराचे निदान करण्यात येणार आहे.अत्याधुनिक मशीनद्वारे हाडांची ठिसूळता तपासणे, साया टीका, हाडांचे जुने आजार, सांध्यांचे प्रत्यारोपण यासह विविध प्रकारचे उपचारांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शिबिराची वेळ आहे.