Skip to content

सांंगलीचा ईपास काढुन मुंबई करांची सातार्यात मोकाट एन्ट्री

बातमी शेयर करा :-

मुंबईकर खेळतायत गाववाल्यांच्या जीवाशी खेळ

सांंगलीचा ईपास काढुन मुंबई करांची सातार्यात मोकाट एन्ट्री

सूर्यकांत जोशी कुडाळ – मुंबई हुन येणाऱ्या लोकांना सातारा जिल्हाचा ईपास मिळाला नाही तर हे लोक सांगली अथवा कोल्हापूरचा पास काढुन सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. पास पुढील जिल्हयांचा असल्याने सातारा जिल्हयाचे प्रवेशद्वार असलेल्या शिरवळ येथे या लोकांच्या हातावर होमक्वारंटाईनचा शिक्का मारला जात नाही. त्यामुळे हे लोक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोकाट एन्ट्री घेत आहेत. सध्याच्या कोरोना आणिबाणीच्या काळात काही मुंबईकर अशा प्रकारे गाववाल्यांच्या जीवाशीच खेळ करत असून प्रशासनाने अजुन काही दिवस तालुक्यांच्या सीमावर तपासणी नाके तैनात ठेवावेत अशी मागणी जनतेतून होत आहे.

             जिल्ह्यातील कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांचा अहवाल पाहिल्यास जवळपास सर्वच रुग्णांना मुंबई ,पुणे यासारख्या कोरोना चा मोठ्या प्रमाणात संसर्ग असलेल्या शहरांतून आलेले व त्यांच्या सहवासित असा संदर्भ आहे. गेल्या पंधरा दिवसातील विचार करता मुंबई हून आलेल्या बहुतांश जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह येत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चोरपावलांनी येणाऱ्या मुंबई करांमुळे हा संसर्ग फैलावन्याची दाट शक्यता आहे.

           ज्यावेळी कोरोनाचा फैलाव जिल्ह्यात फारसा नव्हता त्यावेळी जिल्ह्यात जागोजागी तपासणी यंत्रणा सज्ज होती. आज कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांचा आकडा सहाशेवर पोहचला असताना ही पूर्ण यंत्रणा काढून घेण्यात आली आहे. लोकांच्या जीवाशी मुंबई कर खेळतायत की प्रशासन खेळतय हाच प्रश्न गेले तीन महिने कोरोनाच्या आणि पोलिसांच्या भीतीने घरात बसलेल्या सर्वसामान्य जनतेला पडला आहे. जेव्हा कोरोना पुण्या मुंबईत होता त्यावेळी गावे कडेकोट बंद होती. आज कोरोना गावात पोहचलाय तर दरवाजे सताड उघडे आहेत.

 गावातील दक्षता कमिट्या सतर्क – तहसीलदार

           सांगली, कोल्हापूरचा पास काढुन काही लोक ग्रामीण भागात येत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत प्रत्येक गावातील दक्षता समित्या सतर्क आहेत. छोट्या गावात नविन येणारा लगेच निदर्शनास येत आहे. परंतु मोठ्या गावांनी अधिक दक्षता बाळगणे आवश्यक आहे.आशा व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन नोंदी घेत आहेत. व जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांच्या हातावर  शिक्का मारून पंधरा दिवस होमक्वारंटाईन करण्यात येत आहे.तरीही लोकांनी शक्य तितकी खबरदारी घ्यावी. तसेच गावात जिल्हयाबाहेरून नवीन कोणी आल्याचे निदर्शनास आल्यास ग्रामदक्षता समितीला त्वरित कळवावे असे आवाहन जावली तालुक्याचे तहसीलदार शरद पाटील यांनी केले आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!