जावली तालुक्यातील तीर्थक्षेत्र करहर येथील श्री विठ्ठल रखुमाईची महापूजा संपन्न नामदार शिवेंद्रसिंहराजे व आमदार शशिकांत शिंदे यांचेसह मान्यवरांची उपस्थिती.


सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील पंढरपूर अशी ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र करहर येथील आराध्य दैवत विठ्ठल रखुमाई यांची महापूजा नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे व त्यांच्या पत्नी वैशाली शिंदे यांच्या सह कार येथील तीन वारकरी पती-पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जावली महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, भाजपाचे तालुका अध्यक्ष संदीप परामणे, माजी सभापती हनुमंतराव पार्टे, तहसीलदार हनुमंतराव कोळेकर करहर च्या सरपंच व सदस्य, वारकरी व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे यांची कर्मभूमी असलेल्या काटवली बेलोशी इथून पायी दिंडीला सकाळी अकरा वाजता प्रारंभ झाला या दिंडीत पंचक्रोशीतील विविध गावांमधून संत महात्म्यांच्या दिंड्या सहभागी होतात तसेच प्रशासनाच्या माध्यमातून तसेच विविध यांच्या माध्यमातून चित्ररथ सहभागी होतात. दुपारी चारच्या दरम्यान पायी दिंडी सोहळा करहर येथे पोहोचतो व त्यानंतर या सोहळ्याचा समारोप होतो.