कुडाळ येथे भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते उद्घाटन : तालुकाध्यक्ष संदीप परामने यांच्या कार्याचे नामदार बाबाराजे यांच्याकडून कौतुक


सूर्यकांत जोशी कुडाळ – भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे कुडाळ तालुका जावली येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जावली महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप परामणे,सातारा जिल्हा दिशा समितीचे सदस्य वीरेंद्र शिंदे,मच्छिंद्र मुळीक यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना नामदार बाबाराजे यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. सातारा जावली मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे तालुक्यात पाचवड ते खेड दरम्यान होत असणारा महामार्ग तसेच कुडाळ ते पाचगणी या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या माध्यमातून परिसरातील विकास कामांना चालना मिळणार आहे.त्याचबरोबर प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दृष्टीपथात आल्या असून आगामी निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी अशीच एकजूट कायम ठेवून भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान यावेळी नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केले यावेळी नामदार बाबाराजेंनी संदीप परामणे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पक्ष बांधणीसाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत अशी प्रशंसा सुद्धा केली. यावेळी बाबाराजेंच्या हस्ते तालुका कार्यकारणी निवड झालेल्या सदस्यांना नियुक्ती देऊन सन्मानित करण्यात आले.