Skip to content

जावलीतील कोरोना बाधित गावाच्या यादीत ओझरेचा समावेश – ५८ वर्षीय एक पुरुष कोरोना संक्रमित

बातमी शेयर करा :-

 कोरोना बाधितांच्या यादीत ओझरेचा समावेश – ५८ वर्षीय एक पुरुष कोरोना संक्रमित

कुडाळ – बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात जावली तालुक्यातील ओझरे येथील  ५८ वर्षीय एक पुरुष कोरोना संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले. कोरोना बाधित गावांच्या यादीत ओझरे गावचा आज नव्याने समावेश झाला.मा.  शरथ पाटील सो.तहसीलदार जावली तथा अध्यक्ष तालुका व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या पत्रानुसार मा. मिनाज मुल्ला सो. उपविभागीय दंडाधिकारी तथा इंसिडेंट कमांडर सातारा उपविभाग यांनी ओझरे गांवाला सुक्षकन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू केले आहेत.

    त्यानुसार पूर्वेला भणंग शीव,पश्चिमेला रिटकवली शीव,उत्तरेला वाढीव गावठाणातील घरे ,दक्षिणेला ओझरे गावचे मूळ गावठाण या संपूर्ण परीसराला सूक्ष्म कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!