Skip to content

कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत नूतनीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने रुग्णांची गैरसोय .ना. शिवेंद्रसिंहराजेंनी संबंधित ठेकेदारास सदरचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी.

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्याच्या कुडाळ व करहर विभागातील सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आरोग्याशी निगडित असणाऱ्या कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनी करण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून येथील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित ठेकेदाराला योग्य ती समज देऊन आरोग्य केंद्राचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या कडून होत आहे.

सातारा जावली चे तत्कालीन आमदार व राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सप्टेंबर 2024 मध्ये कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत दुरुस्ती व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेंतर्गत सुमारे 86 लाख 47 हजार रुपये निधी शासनाकडे मंजूर करून आणला होता. त्यानुसार या कामास तातडीने प्रारंभही झाला परंतु हे काम चार ते पाच महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु गेले आठ ते नऊ महिने हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून अजूनही हे काम किमान तीन ते चार महिने पूर्ण होऊ शकणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुमारे 60 ते 65 गावांना आरोग्य सुविधा पुरवली जाते या ठिकाणी सर्पदंश, श्वानदंश याशिवाय गरोदर महिला लहान मुलांच्या विविध प्रकारच्या लसीकरणासोबतच प्रामुख्याने महिलांच्या बाळंतपणाची सोय होत असते याशिवाय विविध प्रकारच्या साथीच्या आजारांच्या बाबतीत रुग्णांवर उपचार होत असतात. परंतु मुख्य इमारतीचे काम सुरू असल्यामुळे येथील आंतररुग्ण विभाग सेवा पूर्णतः कोलमडून गेली आहे.

सध्या या आरोग्य केंद्राचे काम अत्यंत अल्पशा जागेत सुरू आहे. एवढ्याशा जागेत दैनंदिन कामकाज करताना गर्दीमुळे डॉक्टर तसेच आरोग्य सेवकांना आणि रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते. विशेषता महिलांचे बाळांतपणाची सोय नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे अडचणीचे होत आहे तरी हे काम तातडीने व्हावे अशी मागणी रुग्णांच्या कडून होत आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!