आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नातून कुडाळ प्राथमिक शाळा बांधकामासाठी 1 कोटी 40 लाखांचा निधी – सौरभ शिंदे

कुडाळ प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीच्या पाडकामाची पाहणी करताना सौरभ शिंदे व ग्रामस्थ
सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जिल्हा परीषद प्राथमिक केंद्र शाळाकुडाळच्या इमारत बांधकामासाठी तब्बल एक कोटी चाळीस लाखांचा भरघोस निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा वार्षिक नियोजन मधून हा निधी शाळेला मिळण्यासाठी आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांनी पाठपुरावा केला होता अशी माहिती प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिली.
नूतन इमारत लवकरात लवकर उभी रहावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी पूर्वीची वापरण्यास योग्य नसलेल्या इमारतीचे नियमानुसार *निर्लेखन* मंजुर करून घेण्यात आले आहे.त्यानंतर प्जुनी इमारत पाडण्याचे कामास सुरवात करण्यात आली आहे. त्याजागी आता सुसज्ज नविन इमारत उभारण्यात येणार आहे.या कामासाठी कार्यकुशल लोकप्रतिनिधी *मा.आमदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले* यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थ कुडाळ यांच्या वतीने सौरभ शिंदे