Skip to content

महू हातगेघरच्या पाण्यासाठी रंगली कोणाचं कोंबड बांग देणार :

IMG20240205201649
बातमी शेयर करा :-

रामफूलच्या उद्घाटनात  कोंबड्याची जोरदार चर्चा

     

   सोमर्डी येथील रामफूल मल्टी पर्पज हॉलच्या उद्घाटन कार्यक्रमात स्वागत पर भाषणात बोलताना रवींद्र परामणे यांनी महू धरणाचे पाणी लवकर शेतात यावे यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती आमदार शिवेंद्रराजेंना केली.या धरणाचे काम लवकर व्हावे यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकरी प्रयत्न करत आहे. कोणी आ. शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न करत आहेत. याच उद्देशाने रवींद्र परामणे यांनी कोंबडा कोणाचा पण आरऊद्या पण पाण्याची पहाट उजाडू द्या अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना आमदार शिवेंद्रराजे यांनी अत्यंत मिश्किलपणे उत्तर देताना त्यासाठी कोंबड रोगाट पकडून किंवा ज्याला पहाट कधी होणार आहे हे कळत नाही त्याला पकडून काही उपयोग नाही. ज्याला पहाट कधी होते हे कळतं त्यालाच पकडलं पाहिजे असा उपरोधिक टोला लगावला. या धरणाच्या कामात काही धरणग्रस्तांचे प्रश्न बाकी असल्याने आडकाठी आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी नऊ तारखेला जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक असल्याचेही आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!