Skip to content

जावालीचा भूमिपुत्र म्हणणारांनी तालुक्यात विधान परिषदेचा निधी किती दिला :आ. शिवेंद्रसिंह राजे.

बातमी शेयर करा :-

 

सूर्यकांत जोशी कुडाळ -लोकसभेची ही निवडणूक देशाच्या हिताची व देशाच्या प्रगतीची आहे. ही स्थानिक निवडणूक नाही. त्यामुळे देश हिताचा निर्णय या निवडणुकीत घ्यावा लागेल. गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली विकास कामे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची असणारी पत लक्षात घेणे आवश्यक आहे. स्वतःला भूमी पुत्र असल्याचे सांगत भावनिक आवाहन करून विरोधी उमेदवार जावळीतील मतदारांना भुलावत आहेत. त्यांनी आम्हाला जावळीचा स्वाभिमान शिकवू नये. जावलीचा भूमिपुत्र म्हणणारांनी तालुक्यात विधान परिषदेचा निधी किती दिला ते जाहीर करावे असे प्रतिपादन आ. श्री छ.शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले.

               सातारा लोकसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मेढा येथील वसंतगडावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले बोलत होते.यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे,प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे,बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, हणमंतराव पार्टे व मान्यवर उपस्थित होते.

        आ. शिवेंद्रसिंह राजे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या दहा वर्षात कोणताही भ्रष्टाचार नाही. जनतेचा कराचा पैसा पुन्हा जनतेच्या विकासासाठी वापरला जातो. जावली तालुक्याला कोट्यावधिचा निधी कोणी दिला याचा विचार करावा. मतदान करताना भावनिक होऊ नये.भावनिक होऊन निधी मिळणार नाही.कोकणात जोडणाऱ्या रस्त्यासाठी कोट्यावाधिंचा निधी मिळणार आहे. थोड्याच दिवसात हे काम होईल. जो पक्ष आपल्याला निधी देतोय त्याच्या पाठीशी उभे रहावे.संपूर्ण जावली तालुक्यात रस्त्यांचे जाळे विनले आहे. भाजपा मुस्लिम विरोधात नाही. मुस्लिम समाजाची विकास कामे भाजपाच्या माध्यमातून झाली आहेत. बोंडरवाडी धरण शेती साठी करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी केला होता .बोन्डरवाडी धरण लवकरच होईल. महू हातगेघरचे धरणाचे काम अंतिम टप्यात आले आहे. प्रतापगड कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला.त्यामुळे विकास कामे करण्यासाठी उदयनराजे  मोठ्या मताधिक्याने विजयी करा. जावळीचा स्वाभिमान विरोधकांनी आम्हाला शिकवू नये. छत्रपती शिवाजी महाराजांवर जीवापाड प्रेम करणारा जावली तालुका आहे.

विरोधी उमेदवार म्हणजे चिमटे काढून अन डोळे मारून जनतेला भुलवणारा भूमिपुत्र -खा. उदयनराजे

      खा. उदयनराजे म्हणाले,जावली, महाबळेश्वर, पाटण हा सह्याद्रीचा परिसर नजर लागण्या सारखं सौन्दर्य आहे. विकासा अभावी येथील जनतेला विस्थापित व्हावे लागले.गेले पन्नास वर्षे ज्यांना विश्वासाने मतदान केले. त्या काँग्रेसने या विभागाला विकासा पासून वंचित ठेवले.1999साली आपण युती सरकारच्या काळात कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून महू हातागेघर प्रकल्प आणला . परंतु राज्यात सत्तान्तर झाल्याने हा प्रकल्प रखडला.ज्यावेळी विरोधी उमेदवार च्या हातात सत्ता होती त्यावेळी त्यांनी ही कामे का केली नाही. आज गेल्या दहा वर्षात आ. शिवेंद्रराजेंनी विकास कामांच्या माध्यमातून विश्वास सार्थ ठरवला आहे. विरोधी उमेदवार आपण या मातीतले असल्याचे सांगितलं जाते. मग आम्ही कुठले आहोत. आम्ही इथले नाही का. आमचं कुटुंब म्हणजे केवळ बायका मुलं नव्हे तर ही सर्व जनता आमच कुटुंब आहे.  विरोधी उमेदवाराकडे  सिंचन खाते असताना धरणाला निधी का दिला नाही.केवळ घोटाळे करणारा विरोधी उमेदवार आहे. घोटाळा केला नाही तर जामीनसाठी अर्ज का केला. अशी टीका खा. उदयनराजे यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्या वर केली.गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. येणाऱ्या काळात आ. शिवेंद्रराजेंना सोबत घेऊन येथील पर्यटन व विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन खा.उदनराजे भोसले यांनी दिले.

          जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे म्हणाले,देशाच्या हितासाठी चोवीसतास कार्य मग्न राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशाला लाभला आहे. देशातील दहशत वाद मोडीत काढला. रस्त्यांचे जाळे विनले,370 कलम हटवून काश्मीरच्या जनतेला न्याय दिला. राम मंदीर निर्माण केले. भागातलं, गावातल, राजकारण करून उपयोग नाही. स्वतः ला जावळीचा भूमिपुत्र म्हणवणाऱ्याने जावली दूध संघ बंद पाडला , प्रतापगड कारखाना बंद पाडला, बाजार समिती ठप्प केले. धरणाचे काम बंद झाले  स्वतःला जावालीचा भूमी पुत्र म्हणाऱ्यांनी जावली साठी काय केले. त्यांनी महू हातगेघरचे काम का नाही केले. बोंडारवाडी धरणाचे काम केले नाही.अशी खर्मरीत टीका मानकुमरे यांनी केली.

            आज स्वतः ला भूमिपुत्र म्हणता मग मी खासदारलीला उभा असताना माझ्या विरोधात काम केले. एवढेच नाही तर माझ्या भावाला व पत्नीला मारले. त्यावेळी उदयनराजे व त्यांच्या मातोश्रीनी मला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आज आम्ही उदयनराजेच्या पाठीशी ठाम उभे राहणार.आमदार शिवेंद्रसिंह राजेंनी विकास कामांचा डोंगर उभा केला त्यामुळे जावळीतील जनता उदयनराजेना भराघोस मतांनी विजयी करतील.असा विश्वास मानकुमरे यांनी व्यक्त केला.फक्त मला मोकळ ठेऊ नका एखाद महामंडळ द्या अशी मागणी वसंतराव मानकुमरे यांनी केले.

जावंळीतील मतदार शिवेंद्रसिंह राजेंच्या पाठीशी ठाम -सौरभ शिंदे

         प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे म्हणाले, बाबाराजेंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास झाला. अजिंक्य तारा प्रतापगड च्या माध्यमातून शेतकरी व कामगारांना दिलासा मिळाला. महिगाव चा खेळाडू आपल्या टीम मध्ये घेऊ नका असा टोला सुहासगिरी यांना नाव न घेता त्यांनी लगावला. मी ही शिंदेच आहे. परंतु मत छत्रपतींच्या गादीलाच देणार.मतदारांनी विकासाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी खा. उदयनराजे भोसले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन सौरभ शिंदे यांनी केले.

           ज्ञानदेव रांजणे  म्हणाले, जावली काय करणार याची जिल्ह्याला उत्सुकता. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामाच्या पाठीशी जावलीची जनता उभे राहील. दहा वर्षात जे फिरकले नाहीत ते आज जावलीचा वारसा सांगतात. पण निवडणूकीच्या फॉर्म मध्ये जर ते कोरेगावाचा पत्ता लिहीत असतील तर ते मग जावळीचा कोणता स्वाभिमान सांगतात अशी टीका केली.जावली महाबळेश्वर बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे यांनी स्वागत केले.बी जे पी महिलाध्यक्ष गीताताई लोखंडे यांनी आभार मानले.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!