Skip to content

कुडाळच्या पिंपळेश्वर व वाकडेश्वर देवांची यात्रा दि.1 व 2 मे रोजी 

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील अत्यंत जागृत देवस्थान असलेल्या कुडाळ येथील श्री पिंपळेश्वर -आनंदीबाई देवी व श्री वाकडेश्वर – जोगेश्वरीदेवी यांची यात्रा दि.1. व 2 मे रोजी संपन्न होणार आहे.

           बुधवार दि.1 रोजी सकाळी 10 वा. कुडाळ येथे उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. दुपारी 4 वा. मानाच्या सासन काठ्यांची मिरवणूक व रात्री छबीना होणार आहे.

            गुरुवारी दर्जेदार लोकनाट्य तमाशा व सायंकाळी नामांकित कुस्त्या भरवण्यात येणार आहेत. अशी माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.

         दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वा. श्रींचा विवाह सोहळा संपन्न झाला .यावेळी युवकांचे लेझीमचे डाव तसेच ढोलवादनाने भाविकांचे लक्ष वेधून घेले होते. रात्री साडेअकरा वाजता हलगी व ताशांच्या कडकडातात व शंख ध्वनीच्या निनादात श्रींचे  पालखीतून विवाह स्थळी आगमन झाले. त्यानंतर ब्राम्हण पंडितांनी केलेल्या मंत्रोच्चरात विवाह पूर्व विधि करण्यात आला.रात्री बारा वाजता मंगलाष्टके होऊन विवाह संपन्न झाला.

           यावेळी उपस्थित खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व श्री. छ. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा कुडाळ ग्रामस्थ व देवस्थानाच्या वतीने प्रतापराव शिंदे देशमुख यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. तसेच यात्राकमिटीच्या वतीनेही दोन्ही राजांचे स्वागत करण्यात आले. 

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!