Skip to content

कुडाळ येथे दुर्गामाता दौड मध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग : 

बातमी शेयर करा :-

 

सूर्यकांत जोशी कुडाळ – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून दरवर्षी नवरात्रीमध्ये दररोज पहाटे दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते.देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी युवा पिढीला यातून प्रेरणा मिळत असते. या उपक्रमात शेकडोंच्या संख्येने बालवृद्ध सहभागी होतात. अगदी पाच ते पंचवीस वयोगटातील युवक व युवतींचा सुद्धा उत्स्फूर्त सहभाग दिसून येतो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व मावळे पहाटे साडेपाचच्या दरम्यान कुडाळ येथील श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिराजवळ एकत्र येतात. भगवा ध्वज हातात घेऊन हलगी ताशाच्या निनादात श्री दुर्गा माता दौड ला प्रारंभ होतो. यावेळी जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषासोबतच हिंदू धर्म प्रेरणा गीत म्हणत दुर्गामाता दौड संपूर्ण गावातून श्री भवानी माता मंदिरापर्यंत काढली जाते.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!