कुडाळ येथे अवैध पणे दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या एका इसमावर गुन्हा दाखल : तीस हजारांचा मुद्दे माल मेढा पोलिसांनी केला जप्त

सूर्यकांत जोशी कुडाळ – मौजे कुडाळ तालुका जावली जिल्हा सातारा गावचे हद्दीतील कुडाळ ते करहर जाणाऱ्या रोडवर अबोली धाब्याचे समोर रस्त्यावर बेकायदेशीर विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व विक्रीच्या उद्देशाने दारू जवळ बाळगणाऱ्या प्रशांत यशवंत रणखांबे वय 55 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार फ्लॅट नंबर 73 अथर्व अपार्टमेंट शाहूपुरी सातारा याला मेढा पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर इसमाकडून 6720/- रू किमतीची देशी दारू पहिली धार संत्र त्यावर कृष्णा असे सिम्बॉल असलेली 180 मि.लीच्या 70 रुपये किंमत असलेल्या काचेच्या सीलबंद एकूण 96 बाटल्या व 3500/- रु किमतीच्या देशी दारू पहिली धार संत्रा त्यावर कृष्णा असा मराठी मध्ये सिम्बॉल असलेल्या 90 मि.लीच्या 35 रुपये किमतीच्या असलेल्या प्लॅस्टिकच्या सीलबंद एकूण 100 बाटल्या.आणि 20000/- सुझुकी कंपनीची लिस्ट मॉडेलची मोपेड क्रमांक MH 11 BW 3286 लाल व पांढऱ्या रंगाची मोपेड मोटरसायकल असा एकूण 30,220/- किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
स. पो. नि. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार शिंगटे अधिक तपास करत आहेत.