जावलीत आज आणखी आठ रुग्णांची भर

जावलीत आज आणखी आठ रुग्णांची भर
बामणोली तर्फ कुडाळ येथील संशयित पाँसिटीव्ह.
जावली तालुक्यातील कुडाळ करहर विभागावर कोरोना ची वक्रद्रष्टी
सूर्यकांत जोशी कुडाळ -रामवाडी ६,
आखेगानी १,बामणोली तर्फे कुडाळ १ अशा आज एकूण 8 रुग्णांची जावली तालुक्यात भर पडली असून एकूण
113 वर कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण झाले असून 8 मृत्यू झाले आहेत. दरम्यान बामणोली तर्फ कुडाळ या गावाचा आता नव्याने समावेश झाला आहे. कोरोना चे संकट आता कुडाळच्या वेशीवर आल्याने कोरोनाला रोखण्यासाठी उद्यापासून कुडाळ बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.
मार्च अखेरीस कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्या नंतर सुरुवातीला मेढा विभागातील गावांत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सुमारे दोन महिने कोरोना पासून कुडाळ, करहर व सायगांव भाग कोरोना पासून दूर राहिला होता. परंतु गेल्या महिन्यात सायगांव मोरघर, बेलावडे, धोंडेवाडी अशा गावांत शिरलेल्या कोरोनाला स्थानिक लोकांच्या सहकार्याने आरोग्य विभाग आणि प्रशासनाने काबूत ठेवले.
२२ जूनला तालुक्यात एकूण ८१ कोरोना रुग्णांपैकी ६८ जण बरे होऊन घरी गेले होते तर केवळ सहा अँक्टिव्ह रुग्ण उरले होते. तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने घोडदौड करत असतानाच एकदम ब्रेक लागला .गेल्या सात दिवसात तब्बल चोवीस कोरोना पाँसिटीव्ह रुग्णांची वाढ झाली. एकट्या रामवाडी गावात तब्बल सोळा रुग्ण झाले.केवळ कोणाच्या तरी बेजबाबदार पणामुळे हे संकट केवळ एका कुटुंबाला नव्हे तर पै पाहुणे नातेवाईक यांच्या सह संपूर्ण परिसराला परिणाम कारक ठरत आहेत.
गेले चार महिने आरोग्य विभाग, प्रशासन आणि स्थानिक नागरिक कोरोनाला रोखण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. मुंबई करांबाबत आपले पणा दाखवून ग्रामस्थांनी विलगीकरण व्यवस्था केली. पण एखाद्याच्या बेजबाबदार वागण्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ येत असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत. मुंबई कर आपले जरुर आहेत पण त्यांनी सुद्धा आपलेपणाने आपले कुटुंब व गावाची काळजी घेऊन शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळून सहकार्य केले पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जावलीतील बिरामणेवाडी गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील बिरामणेवाडी येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने या गावाला जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या संयुक्त अहवाला नुसार बिरामणेवाडी या गावाला प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.