Skip to content

श्री पिंपळेश्वर- आनंदी देवी व श्री वाकडेश्वर जोगेश्वरी देवी यांचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न :दिनांक 23 व 24 एप्रिल रोजी कुडाळची यात्रा

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – कुडाळ तालुका जावली येथील आराध्य दैवत श्री पिंपळेश्वर- आनंदीबाई देवी वाकडेश्वर – जोगेश्वरी देवी यांचा शाही विवाह चैत्र पौर्णिमेला रात्री बारा वाजता थाटात संपन्न झाला . या विवाह सोहळ्याला लाखोंच्या संख्येने कुडाळ ग्रामस्थ व भावीक उपस्थित होते. या विवाह सोहळ्याच्या पाच दिवसानंतर येणाऱ्या बुधवारी म्हणजेच दिनांक 23 व 24 रोजी कुडाळ ची यात्रा होणार आहे.

कुडाळ येथील देवांचा विवाह सोहळा म्हणजे भाविकांच्या साठी पर्वणीच असते. कुडाळ पंचक्रोशीतील अनेक गावातील भाविक या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहत असतात. श्रींच्या विवाह सोहळ्यानिमित्त संपूर्ण मंडपाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सौ आनंदीबाई देवी व सौ जोगेश्वरी देवी यांच्या मंदिरासमोर विवाह मंडप थाटण्यात आला होता. या विवाह मंडपात श्रींना पालखीतून मिरवणुकीने आणले जाते. यावेळी होणारा ढोल ताशांचा गजर तसेच शंखाचा निनाद आसमंत दुमदुमून टाकत असतो. हे भक्तिमय वातावरण भाविकांच्या मनाला भारावून टाकते. हा विवाह सोहळा अत्यंत दिमाखदार पणे व शांततेत पार पाडण्यासाठी देवस्थान समिती व यात्रा कमिटीच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात आले होते.

श्रीं ना विवाह मंडपात स्थानापन्न केल्यानंतर श्रींच्या परंपरागत मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा केली जाते यावेळी पुरोहितांच्या माध्यमातून मंत्राचाराच्या गजरात या सोहळ्याचा प्रारंभ होतो.पुरोहितांच्या माध्यमातून विवाहपूर्व विधी संपन्न होऊन सुश्राव्य मंगलाष्टका होऊन विवाह सोहळा संपन्न होतो. त्यानंतर परंपरेनुसार श्रींना बोहल्यावर बसवून सेसा भरणे, साडे असे विवाह पश्चातील विधी संपन्न होतात. त्यानंतर श्रींना पालखीतून मिरवणूक केले मुख्य मंदिराच्या मंडपात आणले जाते. यावेळी देवाचे गोंधळी यांच्या माध्यमातून गोंधळ गीतांचा कार्यक्रम होतो. त्यानंतर श्रीना मंदिरात स्थानापन्न केले जाते. हा नयनरम्य विवाह सोहळा डोळेभरून पाहणे म्हणजे भाविकांच्या साठी पर्वणीच असते. श्रींची यात्रा भक्तिमय वातावरणात शांततेत पार पाडावी यासाठी देवस्थान समिती व यात्रा कमिटीच्या माध्यमातून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!