जावळी (पूर्व) मंडल अध्यक्षपदी संदीप परामणे यांची नियुक्ती


सूर्यकांत जोशी कुडाळ :भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि प्रदेश कार्याध्यक्ष मा.आ.श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात नव्याने एकूण 1221 मंडल स्थापन करण्यात आले त्यापैकी 963 मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक जावली तालुका पूर्व मंडल अध्यक्षपदी संदीप परामणे यांची नियुक्ती करण्यात आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यात भाजपाने चांगलीच मुसंडी मारली असून आगामी काळात येऊ घातलेल्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भाजपने संघटनात्मक पक्ष बांधणीला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.
*ना. बाबाराजेंच्या नेतृत्वाखाली जावली तालुक्यात भाजपाचे ध्येयधोरणे व विकास कामे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. अशी प्रतिक्रिया नवनियुक्त मंडल अध्यक्ष संदीप परामणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली *
सातारा विधानसभा मतदारसंघात सातारा शहर मध्य मंडल अध्यक्ष पदी श्री. अविनाश (राजेंद्र) विजय खर्शीकर, सातारा उत्तर मंडल अध्यक्षपदी श्री. महेश भिकू गाडे, जावळी पश्चिम मंडल अध्यक्षपदी श्री. मारुती विष्णू चिकणे, सातारा दक्षिण मंडल अध्यक्षपदी श्री. विजय संपत गुजर, सातारा शहर बाह्य मंडल अध्यक्ष पदी सौ. वैशाली प्रमोद टंगसाळे व *जावळी पूर्व मंडल अध्यक्षपदी श्री. संदीप प्रतापराव परामणे* यांची नियुक्ती करण्यात आली. या नवनिर्वाचित मंडल अध्यक्षांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा कदम, सरचिटणीस विठ्ठल बालशेटवार, सातारा विधानसभा संयोजक अविनाश दादा कदम,जेष्ठ भाजपा नेते दत्ताजी थोरात,माजी नगराध्यक्ष किशोर गोडबोले विधानसभा निवडणूक प्रभारी विकल्प शहा, सातारा शहर मावळते शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब, जावलीचे माजी उपसभापती सौरभ शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.जावळी मंडलचे मावळते अध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी आभार मानले.