Skip to content

कुडाळ पाचगणी रस्त्याला खड्यांचे ग्रहण : वाहन चालक हैराण, चार खड्डे भरून पूर्व मंडल अध्यक्षांची फोटो शेषण करून नुसतीच चमकोगिरी

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील प्रमुख राज्यमार्ग असलेल्या कुडाळ ते पाचगणी या रस्त्याची खड्ड्यानी अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन वाहनांचे नुकसान होत आहे त्याचबरोबर वाहन चालक जायबंदी होत आहेत. भाजपाच्या अध्यक्षांनी मात्र या रस्त्यावरील चार खड्डे भरून घेऊन फोटो शोषण करून चमकोगिरी केल्याची टीका सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

जावली तालुक्याच्या तर पूर्व भागाला पाचवड ते मेढा व कुडाळ ते पाचगणी या दोन प्रमुख राज्य मार्गाने जोडले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवड -मेढा – खेड -रत्नागिरी अशा कोकण महामार्गाचे वेगाने काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम चालू असलेने काही दिवसातच हा रस्ता प्रवासा योग्य चांगला होणार आहे. त्याचबरोबर कुडाळ ते पाचगणी या रस्त्यासाठी सुद्धा नामदार बाबाराजेंनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे परंतु हे काम मार्गी लागण्यास अजून काही कालावधी जाऊ शकतो.सध्या पावसाळा असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.रात्रीच्या अंधारात खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक वाहनाचे अपघात होऊन नुकसान झाले आहे.याच खड्ड्यामुळे एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे.

गेल्या आठवड्यात भारतीय जनता पक्षाच्या पूर्व मंडल अध्यक्षांनी या रस्त्यावरील काही खड्डे भरून घेऊन फोटोसेशन केले त्यामुळे हा रस्ता खड्डे मुक्त होईल अशी भाबडी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होते परंतु प्रत्यक्षात मात्र खड्डे भरण्याची मोहीम तूर्त तरी थांबली असल्याचे दिसून येत आहे. आता लवकरच गणेशोत्सव सुरु होत आहे. त्यापूर्वी तरी मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांनी ना. बाबाराजेंकडे पाठपुरावा करून हा रस्ता खड्डे मुक्त करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी वाहन चालकांमधून आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!