जावलीत शुक्रवारी २८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह

जावलीत शुक्रवारी २८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह; पुनवडी एकूण कोरोना बाधित ११३
जावलीत एकूण २७६, बळी १२, मुक्त ११३, अँक्टिव्ह १५३
कसबे बामणोली ( पावशेवाडी ) 1
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात शुक्रवारी रात्री नऊ वाजता तेरा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला होता. पुन्हा अकरा वाजता आलेल्या अहवालात पंधरा कोरोना बाधितांची वाढ झाली. यामध्ये पुनवडी ८+१४, पावसेवाडी बामणोली १,
दापवडी ३,मेढा १, सायगांव १यांचा समावेश आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली आहे.
पुनवडीची साखळी तोडण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. येत्या दोन दिवसात पुनवडी येथील सर्व संशयितांचे स्वाब घेण्यात येतील अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुखांची पुनवडीला भेट
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज पुनवडी गावाला भेट देऊन परिस्थीतीची पाहणी केली.
कुडाळ वगळता तालुक्यातील अन्य बाजारपेठेच्या गावात कोरोनाची हजेरी
जावली तालुक्यातील मेढा, सायगांव, केळघर, करहर अशा मोठ्या बाजारपेठेच्या गावात कोरोनाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठेचे गाव असलेल्या कुडाळने मात्र लोकांच्या जागरुकमुळे अद्याप पर्यंत कोरोनाला प्रवेश करता आलेला नाही.प्रशासन,पोलीस,आरोग्य विभाग, ग्रामदक्षता कमेटी, ग्रामपंचायत, आशा व अंगणवाडी सेविका,विविध तरुण मंडळे ,सामाजिक व राजकीय नेते व कार्यकर्ते , व्यापारी यांचा योग्य समन्वय असल्याने ही महामारी गावाबाहेर रोखण्यासाठी जागरुक पणे काम करत आहे.
पुनवडीच्या सरपंचासह चौघांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा हाँटस्पाँट ठरलेल्या जावली तालुक्यातील पुनवडी येथील सरपंचांसह तिघांवर संचारबंदी कायद्याचे व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच होमक्वारंटाईनचे नियम पाळण्यात आले नाहीत व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली आहे.
लाँकडाऊनला जावली तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद ;
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लागू केलेल्या लाँकडाऊनला पहिल्या दिवशी जावली तालुक्यात लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जावली तालुक्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या ध्यानात घेऊन लोकांनी स्वतः होऊनच घरात बसणे पसंत केले.
आज तालुक्यातील मोठ्या बाजारपेंठांसह अगदी खेडोपाडी शुकशुकाट जाणवत होता.त्यातच पावसाची रिपरिप सारखी चालू असल्याने शेतातील कामे ठप्प होती.त्यामुळे अगदी अत्यावश्यक कारणासाठीच लोक बाहेर होते.कोणत्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय लोकांनी आज पाळलेली शिस्त पाहता लोकांमध्ये कोरोना बाबत जागृती झाली आहे असेच म्हणावे लागेल.
सातारा जिल्ह्यातील हा लाँकडाऊन लोक हितावह असल्याने असाच संयम लोकांनी पुढील दहा दिवस दाखवावा असे आवाहन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केले आहे.