Skip to content

पुनवडी गावची स्वाब तपासणी पूर्ण; जावलीत आज चार बाधित ,

बातमी शेयर करा :-

पुनवडी गावची स्वाब तपासणी पूर्ण; जावलीत आज चार बाधित , पुण्याच्या लँबचे अहवालाला विलंब चिंता वाढवणारा.

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कोरोनाचा हाँटस्पाँट बनलेल्या पुनवडी येथील सर्व ग्रामस्थाची स्वाब तपासणी आज पूर्ण झाली आहे. दरम्यान पुण्याच्या लँबला तपासणी साठी पाठवण्यात आलेल्या स्वाबचे अहवाल काल पासून आले नाहीत. त्यामुळे त्यामध्ये कोणी बाधित असेल तर अडचणीत वाढ होणार आहे.

    आज रविवारी अँन्टीजेन रँपिट टेस्ट द्वारे एकूण ८० लोकांची स्वाब तपासणी करण्यात आली. यामध्ये पुनवडी येथील २,  सायगांव १ व दापवडी १ अशा चार जणांचे अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आले आहेत. एकूणच पुनवडी येथील कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने अथक प्रयत्न केले आहेत. आगामी काही दिवसात पुनवडी गावात कोरोना रुग्ण आढळला नाही तर ही साखळी तोडण्यात प्रशासन यशस्वी झाले असे म्हणता येईल. गेल्या दोन दिवसात पुणे येथील लँबला पाठवण्यात आलेले अहवाल येणे बाकी आहे.

             आज पुनवडी येथील सर्वच ग्रामस्थांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुनवडी येथील लोकसंख्या ५९१ असून मुंबई कर १३८ जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने असे एकूण ७२९ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील आजपर्यंत ११९ पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आले आहेत.  तर या गावातील दोघांचा कोरोना मुळे बळी गेला आहे.पुनवडी येथील बधितांची संख्या वाढू लागल्याने तहसीलदार शरद पाटील यांनी मेढा आगाराच्या २ बसेस द्वारे पुनवडी येथील ग्रामस्थांना भणंग पर्यंत तपासणीसाठी पाठवण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली होती.

सततच्या लाँकडाऊन मुळे छोटे व्यावसायिक अडचणीत

           कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व आवश्यक यंत्रणा उभी करण्यासाठी मार्च महिन्या पासून वेळोवेळी लाँकडाऊन करण्यात आल्या मुळे छोटे व्यावसायिक चांगलेच अडचणीत आले आहेत. तर केवळ या व्यवसायांवर उपजिविका असणाऱ्या व्यावसायिकांवर उपास मारीची वेळ आली आहे. या व्यावसायिकांना शासनाने मदतीचा हात द्यावा अशी जोरदार मागणी व्यावसायिकांमधून करण्यात येत आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!