जावलीत आज २3 जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह;

जावलीत आज २3 जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह;८ जणांना डिस्चार्ज.
एकूण ४२९ , बळी १५ , डिस्चार्ज ३३१, अँक्टिव्ह ८३
दुदुस्करवाडी कोरोना बाधितांचा
आकडा ५९ वर
सायगांव कोरोना मुक्त
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील पुनवडी पाठोपाठ दुदुस्करवाडीत आता कोरोनाची मोठी साखळी तयार झाली असून आज अँटिजेन टेस्ट मध्ये २१ तर स्वाब मध्ये २ असे या गावातील तब्बल २३ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे.दुदुस्करवाडी या गावातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा आता ५९ वर पोहचला आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
सायगांव येथील कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले असुन आज सर्व बाधितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली आहे.
सायगांव कोरोना मुक्त
प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. गेल्या चार महिन्यात सायगांवला कोरोनाने वेळोवेळी धक्के दिले. त्यामुळे सर्वच ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आता यापुढे कोरोनाचा पुन्हा गावात शिरकाव होऊन अशी वेळ येऊ नये.यासाठी सर्व ग्रामस्थ अधिक दक्ष राहतील असा विश्वास सायगांव चे सरपंच अजित आपटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.