Skip to content

जावली तालुक्यात कोरोनाची आगेकूच सुरुच;आज ६ बाधित

बातमी शेयर करा :-

एकूण ४४६ , बळी १५ ,  डिस्चार्ज ३४२, अँक्टिव्ह ८

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोनाची आगेकूच सुरूच आहे.आज तालुक्यात सहा कोरोना बाधितांची भर पडली आहे.कुडाळ येथे रविवारी आढलेल्या कोरोना बाधिताच्या हायरिस्क काँन्टँक्ट मधील सात जणांची अँटिजेन टेस्ट घेण्यात आली पैकी अकरा वर्षाच्या एका बालकाचा अहवाल कोरोना बाधित आला असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली. आता या मुलाच्या क्वान्टँक्ट मधील मुलांचा व लोकांचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

          रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात दुदुस्करवाडी येथील एकाचा अहवाल कोरोना बाधित आला. तर आज सत्तावीस जणांच्या घेतलेल्या अँटिजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल कोरोना बाधित आला.आता या तीन लोकांचे हायरिस्क काँन्टँक्ट मधील लोकांची तपासणी उद्या करण्यात येणार आहे. तर खर्शी तर्फ कुडाळ येथील बाधित गर्भवती महिलेच्या हायरिस्क काँन्टँक्ट मधील अकरा जणांची घेण्यात आलेली अँन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली. दरम्यान दुदुस्करवाडी येथील कोरोना बाधितांची संख्या आता सत्तर वर पोहचली आहे.

        सातारा येथील क्रांतीसिंह नानापाटील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ओझरे येथील एकाचा अहवाल कोरोना बाधित आला असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

   कुडाळची बाजारपेठ उद्या पासुन सुरू

         दरम्यान कुडाळ येथे  कोरोना बाधित आढळल्याने दोन दिवस कुडाळ बाजारपेठ दोन दिवस बंद ठेवण्यात आली होती. परंतु उद्या पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी व ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती सरपंच विरेंद्र शिंदे यांनी दिली.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!