जावलीत कोरोना बाधितांचा आकडा साडेचारशे च्या उंबरठ्यावर

कुडाळचा धोका वाढला, आज आणखी तीन कोरोना पाँझिटीव्ह. कुडाळ एकूण -५
एकूण ४४९ , बळी १५ , डिस्चार्ज ३४७ , अँक्टिव्ह ९२
‘भिऊ नका, स्वतः ची व आपल्या
कुटुंबियांची काळजी घ्या.’
सूर्यकांत जोशी कुडाळ – आज कुडाळ येथील अडोतीस जणांची अँटिजेन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये कुडाळ मधील एका बत्तीस वर्षीय व्यक्ती सह दोन वर्षाचा मुलगा व बारा वर्षाच्या मुलीचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. काल बाधित आढळलेल्या अकरा वर्षीय बालकाच्या संपर्कातील आज पस्तीस मुलांची अँटिजेन टेस्ट घेण्यात आली होती .यातील अन्य मुलांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.आज तालुक्यातील पाच जण कोरोनावर यशस्वीपणे मात करून घरी परतले आहेत.
बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतः होऊन आरोग्य विभागाशी संपर्क साधावा तसेच जर कोणाला सर्दी, ताप, खोकला ,जुलाब, घशातील खवखवणे यासह अन्य लक्षणे दिसून येत असतील तर त्यांनी तातडीने प्राथमिकआरोग्य केंद्रात संपर्क साधावा.तसेच कन्टेंमेंट झोन मधील लोकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी केले आहे.
दरम्यान कुडाळ मधील कोरोना साखळी तोडण्यासाठी तहसीलदार शरद पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आशा व अंगणवाडी सेविका तसेच कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारीडॉ. अनंत वेलकर व आरोग्य कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
जावलीतील ओझरे गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील ओझरे येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार ओझरे या गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.