Skip to content

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा जावली तालुक्यात शुभारंभ

IMG-20200916-WA0032
बातमी शेयर करा :-

  मेढा – जावली तालुक्यात कोरोना रुगणांचा वाढता फैलाव रोखण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत असून नागरिकांनीही माहिती न लपवता आरोग्य कर्मचाऱयांना सहकार्य करावे यासाठी शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत आपल्या घरी आलेल्या कोव्हिड दूतांच्या टीमला खरी माहिती सांगून जावली तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करूया असे प्रतिपादन तहसीलदार शरद पाटील यांनी व्यक्त केले

             जावली तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ तहसीलदार शरद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुद्धे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भगवान मोहिते,मुख्याधिकारी अमोल पवार,डॉ साधना कवारे,नगरसेवक शशिकांत गुरव,विकास देशपांडे,मुख्याध्यापक सुरेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते 

                 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भगवान मोहिते म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम १५ सप्टेंबर ते २५ ओकतोम्बर कालावधीत दोन टप्प्यात राबवण्यात येणार आहे या मोहिमेत चार जणांची टीम दररोज पन्नास कुटुंबांची घरी जाऊन तपासणी करून नागरिकांना आरोग्य शिक्षण देणार आहे लवकर निदान व लगेच उपचार असा या मोहिमेचा उद्देश असून जावली तालुक्यात २३४३४ कुटुंब असून ३४ टीम च्या साहाय्याने पंधरा दिवसात हा सर्व्हे पूर्ण करणार आहोत 

            या टीम मध्ये प्रशिक्षित एक आरोग्य कर्मचारी,एक आशा व दोन स्वयंसेवक असणार आहेत त्यांना कोव्हिड दूत संबोधण्यात येणार आहेत तालुक्यातील नागरिकांनी आपल्या घरी आलेल्या कोव्हिड दूतांना सहकार्य करावे असे आवाहन डॉ मोहिते यांनी केले कार्यक्रमाला आरोग्य सेवक सतीश मर्ढेकर व आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका व नागरिक उपस्थित होते आरोग्य सेवक विशाल रेळेकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार नगरसेवक विकास देशपांडे यांनी मानले

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!