कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंचे सुयश

कुडाळ – स्वरा गार्डन मंगल कार्यालय जोशी विहीर या ठिकाणी बुडोकान कराटे अँड स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित दहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले
या स्पर्धेत कराटेच्या विविध प्रकारात विजेते खेळाडू पुढील प्रमाणे श्री राज संजय वायदंडे काता ब्राँझ कुमिते सिल्वर, सोहम लखन पवार काता कुमिते गोल्ड,हुजेफा आसिफ शेख काता ब्राँझ कुमिते सिल्वर, वरद विद्याधर पोफळे काता कुमिते सिल्वर, शिवराज अतुल भिसे काता कुमिते सिल्वर,गौरव राजेंद्र साळुंखे काता कुमिते ब्राँझ,अनुष्का अविनाश गोंधळी काता सिल्वर कुमीते गोल्ड, श्रावणी राजेंद्र साळुंखे काता सिल्वर कुमीते गोल्ड,सानिका लखन पवार काता कुमिते ब्राँझ अशा पदकांची कमाई केली.या स्पर्धेमध्ये सातारा, सांगली,कोल्हापूर,ठाणे मुंबई,पुणे, रायगड इत्यादी जिल्ह्यातून 253 स्पर्धकांनी भाग घेतला होता सदर स्पर्धेचे आयोजन तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक गणेश शिंदे यांनी केले.विजेत्या खेळाडूंना अविनाश गोंधळी पुरुषोत्तम मोहिते आसिफ शेख विनोद डबडे प्रीती गोंधळी अवधूत खटावकर यांनी मार्गदर्शन केले
फोटो – विजेते खेळाडूं सोबत प्रशिक्षक अविनाश गोंधळी, गणेश शिंदे,पुरुषोत्तम मोहीते, व इतर ( सूर्यकांत जोशी )
