हा तर जावली तालुक्यातील शेताकऱ्यांसाठी सुवर्ण क्षण : आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले

** अजिंक्य तारा प्रतापगड साखर उद्योग समूहाचे बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न **

सूर्यकांत जोशी कुडाळ – माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या संकल्पनेतून व माजी चेअरमन राजेंद्र शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून उभा राहिलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना अनंत अडचणीवर मात करून आज पुन्हा सुरू होत आहे हा जावली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णक्षण आहे असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सोनगाव करंदोशी तालुका जावली येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अजिंक्यतारा प्रतापगड उद्योग समूहाच्या माध्यमातून आगामी गळीत हंगामासाठी बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा मोठया उत्साहात नुकताच संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले बोलत होते.
कार्यक्रमाला सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंमरे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या माझी चेअरमन व मार्गदर्शक संचालिका श्रीमती सुनेत्रा शिंदे, चेअरमन सौरभ राजेंद्र शिंदे, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी संचालक राजेंद्र भिलारे, अजिंक्यतारा व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, जावली तालुका शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, कैलासिंगराव बापूसो शिंदे सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन अंकिता शिंदे, जावली पंचायत समितीचे माजी सभापती अरुणा शिर्के,उपसभापती हणमंतराव पार्टे, व मान्यवर उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले,प्रतापगड कारखाना जावली तालुक्यातील जनतेच्या आपल्या हक्काचा आहे. तो सुरु ठेवायचा की नाही हे आता येथील शेतकऱ्यांनी ठरवावे. साखर कारखान्याच्या माध्यमातून जावली तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून लालसिंगराव शिंदे यांनी हा कारखाना उभा केला. हा कारखाना सर्वसामान्य जनतेच्या मालकीचा आहे. आम्ही केवळ आर्थिक दृष्टीने आजारी असणाऱ्या कारखान्याला उपचार करण्यासाठी आलो आहोत. कारखाना चांगला उभा राहिला की तो ज्याचा त्याने चालावावा.
प्रतापगड कारखाना सुरळीत चालावा यासाठी कोणतेही राजकारण न करता सर्व ऊस तोडला जाईल. या गळीत हंगामात अजिंक्य तारा प्रतापगड उद्योगाने चारलाख मे मे. टन ऊस गळापाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास प्रतापगड कारखाना लवकर सक्षम होईल. प्रतापगड लवकर कर्ज मुक्त होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील. ऊस दराच्या बाबतीत इतर कारखान्या तुलेनेत आपला कारखाना कुठेही मागे राहणार नाही अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांची या वर्षीची दिवाळी गोड करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल.. आपल्या गावातील ऊस अन्य कारखान्याला जाणार नाही या साठी संचालक व कर्मचारी यांनी दक्ष रहावे.महू हातगेघर व बोन्डरवाडीचे पाणी लवकरात लवकर शेतात यावे यासाठी प्रयत्न करणार. असल्याचे यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
वसंतराव मानकुमरे म्हणाले, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ऊस पहिला तोडला पाहिजे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जावली तालुक्यातील रस्ते तसेच विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. जावली तील जनतेचे पाठबळ त्यांच्या मागे भक्कम राहील.
सौरभ शिंदे म्हणाले, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीपासून नैसर्गिक,आर्थिक, कौटुंबिक अनेक संकटे आली. परंतु त्यावर मात करून सुवर्ण दिवस उजाडला आहे. या पुढील काळात प्रतापगड सहकारी साखर कारखाना जोमाने चालण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
प्रारंभी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ऍड.शिवाजीराव मर्ढेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी छायाताई मर्ढेकर यांच्या हस्ते बॉयलर चे विधिवत पूजन व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर आमदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, माझे व्हाईस चेअरमन अंकुशराव शिवनकर व मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.
व्हा. चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. संतोष गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. व्हॉइस चेअरमन नामदेव सावंत यांनी आभार मानले.