Skip to content

प्रतापगड’ कडून ११ कोटी ३३ लाख ६२ हजार ३२ रुपये बँक खात्यात जमा:आ. शिवेंद्रसिंहराजें

बातमी शेयर करा :-

‘प्रतापगड’ कडून ११ कोटी ३३ लाख ६२ हजार ३२ रुपये बँक खात्यात जमा

कुडाळ : अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून दि. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन ३००० रुपये याप्रमाणे होणारी रक्कम ११ कोटी ३३ लाख ६२ हजार ३२ रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती उद्योग समूहाचे मार्गदर्शक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.

अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या माध्यमातून जावली तालुक्यातील बंद अवस्थेत असलेला प्रतापगड कारखाना या हंगामापासून सुरु करण्यात आला आहे. कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून दि. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत ३७७८७.३४४ मे. टन गाळप झाले. या गाळप झालेल्या उसाचे पेमेंट प्रतिटन ३००० रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम ११ कोटी ३३ लाख ६२ हजार ३२ रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज वर्ग करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी म्हणजेच दि. ५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५८७३६.६६१ मे. टन उसाचे गाळप झाले असून प्रतिटन ३ हजार रुपये याप्रमाणे त्याची होणारी रक्कम १७ कोटी ६२ लाख ९ हजार ९८३ रुपये यापूर्वीच वेळेवर संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. चालू गळीत हंगामात दि. ५ नोव्हेंबर २०२३ ते १४ जानेवारी २०२४ अखेर एकूण गाळप १७८८२६.०४९ मे. टन झाले आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!