Skip to content

परामनेंच्या ‘रामफूल’मध्ये ग्रामीण वधुवरांना थाटात विवाह करण्याची संधी -आ. शिवेंद्रसिंहराजे

n
बातमी शेयर करा :-

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र परामणे यांनी गोरगरीब कुटुंबातील वधुवरांना  थाटात लग्न करता यावे यासाठी वाजवी दरात याठिकाणी सुविधा उपलब्ध केली आहे.त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलामुलींची विवाह थाटात करण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी प्राप्त झाली आहे असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजें भोसले यांनी केले.

              सोमर्डी ता. जावली येथील रामफूल कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून  सुरु करण्यात आलेल्या मल्टीपर्पज हॉलचे उदघाट्न आ. शिवेंद्रसिंहराजें भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जावली महाबळेश्वर बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे,जावली पंचायत समितीच्या माजी सभापती अरुणा शिर्के,माजी उपसभापती तानाजीराव शिर्के, चंद्रकांत तरडे कुडाळ सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे डॉ. विलास परामणे,उपस्थित होते.

कुडाळी प्रकल्पातील पाणी माणला नेहण्याचा प्रशासनाचा प्रयत्न हाणून पाडला 

             कुडाळी प्रकल्पाच्या महू व हातगेघर धरणातील पाणी माण तालुक्यातील आंधळी धरण भरण्यासाठी नेहण्यात येणार होते. परंतु ही बाब आपल्या लक्षात येताच प्रशासनाचा हा प्रयत्न आपण वेळीच रोखला. जावली तालुक्याच्या हितासाठी आपण सदैव दक्ष असल्याचे यावेळी आमदार शिवेंद्रराजे यांनी सांगितले. सोमर्डी गावातील रस्त्याचे काम मंजूर झाल्याचे ग्रामस्थांना माहित नव्हते त्यामुळे रवींद्र परामणे यांनी या रस्त्याची मागणी केली होती

.परंतु हे काम मंजूर झाले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल व हे काम अत्यंत दर्जेदार होण्यासाठी सुद्धा आपण सूचना दिल्या असल्याचे सांगून आमदार शिवेंद्रराजे यांनी सोमवारी ग्रामस्थांना सुखद धक्का दिला.

रामफूलच्या उद्घाटनात  कोंबड्याची जोरदार चर्चा

         या कार्यक्रमात स्वागत पर भाषणात बोलताना रवींद्र परामणे यांनी महू धरणाचे पाणी लवकर शेतात यावे यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती आमदार शिवेंद्रराजेंना केली.या धरणाचे काम लवकर व्हावे यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकरी प्रयत्न करत आहे. कोणी आ. शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न करत आहेत. याच उद्देशाने रवींद्र परामणे यांनी कोंबडा कोणाचा पण आरऊद्या पण पाण्याची पहाट उजाडू द्या अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना आमदार शिवेंद्रराजे यांनी अत्यंत मिश्किलपणे उत्तर देताना त्यासाठी कोंबड रोगाट पकडून किंवा ज्याला पहाट कधी होणार आहे हे कळत नाही त्याला पकडून काही उपयोग नाही. ज्याला पहाट कधी होते हे कळतं त्यालाच पकडलं पाहिजे असा उपरोधिक टोला लगावला. या धरणाच्या कामात काही धरणग्रस्तांचे प्रश्न बाकी असल्याने आडकाठी आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी नऊ तारखेला जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक असल्याचेही आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

अजिंक्य प्रतापगडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तज्ञाचे मार्गदर्शन

अजिंक्य प्रतापगड साखर उद्योग समुहाच्या माध्यमातून या गळीत हंगामात साडेतीन लाख मे. टन ऊस गळापाचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. त्याप्रमाणे गळीत हंगाम वेगाने सुरु आहे. यावर्षी जावळीतील शेतकऱ्यांनी ऊस देऊन सहकार्य केले तसेच या पुढेही करावे. या वर्षी पाऊस कमी झाल्याने अडचणी आहेत. परंतु कमी पाण्यात उसाचे उत्पन्न कसे घ्यावे यासाठी लवकरच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. असे आ. शिंदे यांनी या वेळी सांगितले.

           सौरभ शिंदे म्हणाले, जावली तालुक्यात पर्यटनाला भरपूर वाव आहे. अनेक पर्यटक पाचगणी महाबळेश्वरला पाचवड कुडाळ मार्गे जात असतात. या पर्यटकांना रामफूलच्या माध्यमातून चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याबरोबरच सर्वसामान्य कुटुंबातील मुलांची लग्न थाटात व्हावी हा दृष्टिकोन ठेऊन तशी सुविधा निर्माण करण्याची रवींद्र परामणे यांची संकल्पना स्तुत्य आहे.

            प्रकाश परामणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!