आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना जावली तालुक्यातील महिलांनी धो धो पावसाप्रमाणेच मताधिक्य द्यावे : श्री. छ. वेदांतिकाराजे भोसले


सूर्यकांत जोशी कुडाळ – जावळीच्या महिला मेळाव्याला पावसाने लावलेली हजेरी हा शुभशकून आहे. या धो धो पावसा प्रमाणेच आ. शिवेंद्रसिंहराजेंना मताधिक्य द्यावे असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा श्री. छ. वेदांतिकाराजें भोसले यांनी केले.
सातारा जावली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आखाडे तालुका जावली येथील मेरी एंजल स्कूल येथे आयोजित मसवे गटातील महिलांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
यावेळी माजी सभापती अरुणा शिर्के आणि अध्यक्षीय मार्गदर्शन वेदांतिकाराजे भोसले वहिनीसाहेब यांनी केले तसेच उपस्थित मध्ये बाजार समिती संचालिका योगिता शिंदे, धनश्री तरडे, वैशाली पांगरे इत्यादी होत्या आभार मेरी एंजल स्कूल च्या अध्यक्ष क्रांती पवार यांनी मानले. मेळावा यशस्वी होनेसाठी श्री. सरपंच समाधान पोफळे ,श्री.अजय शिर्के, अजय पाडळ तसेच वैशाली पांगारे श्री मारुती शिर्के, अमित पवार श्री.रणजित शिंदे,विक्रम शिंदे संदीप निकम,राजू महाडिक, विकास धोंडे ,जीवन भोसले इत्यादी यांनी प्रयत्न केले..
स्वागत मेरी इंजल्स स्कूल चे श्री.करण यशवंत पवार यांनी केले. प्रास्ताविक सरपंच परिषद राज्य उपाध्यक्ष समाधान पोफळे यांनी केले. मनोगत नितीन गावडे,