आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या विजयाने जावली तालुक्यात जल्लोष

0
4

सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जावली विधानसभा मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्रात एक नंबरचे मताधिक्य मिळवत विजय संपादन केला. आमदार बाबाराजे यांना पहिल्या फेरीपासून मताधिक्य मिळत गेल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साह व जल्लोषाला उधान आले होते. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाचे उधळण झाल्याने संपूर्ण जावळी तालुका गुलाबी रंगाने न्हाऊन निघाला होता.

लोकसभा निवडणुकीत भूमिपुत्र म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांना जावलीत थोडेसे मताधिक्य मिळाले. त्याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांना जावली तालुक्यातून किती मते मिळतात याची उत्सुकता होती. परंतु जावलीतील मतदारांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना सुमारे 35 हजार मतांचे प्रचंड मताधिक्य जावली तालुक्यातून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणतीही निवडणूक असो जावली तालुक्यात निवडणुकीचे सूत्रे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंमरे यांच्या हातात असतात. लोकसभेमध्ये झालेले मतांचे विभाजन विधानसभेत होऊ नये यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे तसेच प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी काळजीपूर्वक केले होते. परिणामी जावली तालुक्यातील तिन्ही जिल्हा परिषद गटातून विरोधात जावळीचा उमेदवार असून सुद्धा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रचंड मताधिक्य देण्यात यश आले.आ. बाबाराजेना कुडाळ गटातून 11971,म्हसवे गटातून -10972 तर कुसुम्बी गटातून 11788 मतांची आघाडी मिळाली आहे.

सातारा जावली विधानसभेचा निवडणुकीचा निकाल मतमोजणी पूर्वीच लागलेला होता. त्यामुळे निकालाच्या आधी दोन दिवस कार्यकर्त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विजयाचे बॅनर प्रमुख रस्त्यावर व चौकात झकावले होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये केलेली विकास कामे, युवा कार्यकर्त्याशी जोडलेले मैत्रीचे नाते व ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांना दिलेले आदराचे स्थान यामुळे बाबाराजेंच्या विषयी आबाल वृद्धांमध्ये अतूट असे नाते निर्माण झाले होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यावा असा प्रश्नच महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडला होता. समोर पराभव दिसून येत असल्याने सातारा विधानसभा मतदारसंघाची हक्काची असणारी जागा शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला देऊ केली. सातारा जावली मध्ये शिवसेनेचे तह आयात निष्ठेने काम करणाऱ्या अनेक कार्यकर्ते असताना राष्ट्रवादीतील अमित कदम यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना शिवसेनेचे उमेदवारी देण्यात आले. वास्तविक या सर्व झालेली नाट्यमय घडामोडी पाहता अमित कदम यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला जाणीवपूर्वक उमेदवारी देऊन आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या विजयाचा मार्ग अधिकच खुला करून दिला अशी चर्चा आहे.

या निवडणुकीत जावली तालुक्याचा विचार करता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी नेत्यांची व कार्यकर्त्यामध्ये चढाओढ लागली होती. ही निवडणूक कार्यकर्त्यांनीच आपल्या हातात घेतले होती. गट,गण व प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते घरोघर जाऊन आमदार बाबाराजेंच्यासाठी प्रचार करत होते. याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्रीहरी गोळे व काही कार्यकर्ते सुक्तपणे परिस्थितीवर बारकाईने निरीक्षण ठेवून योग्य ते मार्गदर्शन व सुप्त प्रचार यंत्रणा राबवत होते. या निवडणुकीत बाबाराजेंना मिळालेले प्रचंड मताधिक्य हे सांघिक प्रयत्नांचे यश आहे.

*कुडाळ जिल्हा परिषद गटात सौरभ शिंदे यांचा करिष्मा*

कुडाळ जिल्हा परिषद गटात कारखाना गटाचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. आमदार बाबाराजे यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथे झालेल्या जाहीर सभेत सौरभ शिंदे यांनी जावली तालुक्यात मतांची आघाडी देण्यात कुडाळगट पुढे राहील असा शब्द दिला होता तो शब्द या निवडणूक निकालानंतर खरा केला असल्याचे दिसून येत आहे. कुडाळ गटात मतदानात कोणताही धोका टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले. त्यासाठी सौरभ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुंमरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती जयश्री गिरी, सुहास गिरी,जावली बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे,माजी सभापती राजेंद्र शिंदे, सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे, जितेंद्र शिंदे, समीर आतार,प्रवीण देशमाने,मच्छिंद्र मुळीक इत्यादी महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आमदार बाबाराजेंना कुडाळ गटातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न केले. माजी आमदार लालसिंगराव शिंदे व प्रतापगड कारखान्याचे माजी चेअरमन राजेंद्र शिंदे यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखाना, जावली तालुका खरेदी विक्री संघ, लालसिंगराव बापूसो शिंदे पतसंस्था इत्यादी सहकारी संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे सौरभ शिंदे यांच्याकडे आहे. या संस्थांचे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ सौरभ शिंदे यांच्या मागे आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना जावली तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळावे यासाठी म्हसवे गटातून ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, माजी सभापती अरुणा शिर्के, माजी उपसभापती रवींद्र परामणे, हनमंतराव पार्टे, दत्ता गावडे, संदीप परामने अजय शिर्के, नितीन गावडे, नितीन मानकुंमरे दत्ता भालेघरे, प्रमोद शिंदे यांनी तसेच कुसुंबी गटातून जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे व त्यांचे कार्यकर्ते, मेढा शहरातून पांडुरंग जवळ,दत्तांआण्णा पवार, विकास देशपांडे विठ्ठल, देशपांडे, तुकाराम धनवडे तसेच महिला अध्यक्ष गीता ताई लोखंडे यांनी विशेष प्रयत्न केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here