आज काय असेल कोरोना अहवाल. उत्सुकता आणि मनाला रुखरुखही.

आज काय असेल कोरोना अहवाल. उत्सुकता आणि मनाला रुखरुखही.
सूर्यकांत जोशी कुडाळ – गेल्या चार महिन्यांत कोरोनाने सर्वांची जीवनशैली चांगली च बदलीय.रोजचे येणारे कोरोना अहवाल हा औत्सुक्याचा विषय बनला आहे. आज शुक्रवारी सगळेजण आतुरतेने वाट पहात आहेत पण साडेनऊ वाजले तरीही अहवाल येईना. काय असेल आजचा कोरोना अहवाल याची उत्सुकता आता सर्वांना च वाटू लागली आहे.अखेर अहवाल आला .आज जावलीत कोणीही नवीन नाही. जावली करांनी सोडला निश्वास.
कोरोना अहवालातील आज कोणत्या गावात किती रुग्ण असतील. त्यात आपले किंवा शेजारील गावतर नाहीना.आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील किती रुग्ण वाढले किती कमी झाले .कुणाचा बळीतर गेला नाही ना अशा अनेक गोष्टींची उत्सुकता सर्वांना लागलेली असते.मोबाईल वरील सगळे ग्रुप चाळून कुठे काही बातमी दिसतेय का. हे शोधण्याचा सगळ्यांचाच खटाटोप सुरू असतो.
एखाद्या गावात एखादा जरी कोरोना पाँसिटीव्ह सापडला तरी त्या गावाला कन्टेमेंट झोन च्या कालावधीत अगदी वनवासा प्रमाणे भासतो. एक करत, अन् सगळ्यांना भोगावं लागतं अशीच काहीशी प्रतिक्रिया या गावच्या लोकांमधून येते.