ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संगणक साक्षर व्हावे : संदीप शिंदे

फँटस्टिक सायकलिंग ग्रुप कडून दहा संगणक : कुडाळच्या प्राथमिक शाळेला सुमारे अडीच लाखाच्या साहित्याची मदत

सूर्यकांत जोशी कुडाळ : आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात संगणक साक्षरता ही काळाची गरज असून शिक्षणात याला अनन्यसाधारण महत्व आहे. यादृष्टीने ग्रामीण भागातील शाळाही मागे राहू नयेत. शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड मिळवी या भूमिकेतून दिवंगत हिंदूराव कृष्णराव शिंदे-देशमुख यांचे स्मरणार्थ फँटस्टिक सायकलिंग ग्रुप पुणे व संदीप शिंदे यांच्या माध्यमाने कुडाळच्या आदर्श केंद्रशाळेस संगणक कक्ष निर्मितीसाठी दहा संगणक व इतर साहित्य अशी वस्तूरूपाने सुमारे अडीच लाखाची मदत करून दातृत्वाभाव जोपासला आहे.त्यांच्या दातृत्वाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कुडाळ शाळेत नुकताच संगणकप्रदान कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी फँटस्टिक सायकलिंग ग्रुपचे पराग पाटील , दिपक फल्ले, डॉ.सतीलाल पाटील , ऋषिकेश घारे , संदिप शिंदे , हेमलता शिंदे , हेमंत शिंदे , राजेंद्र शिंदे ,महेश शिंदे , प्रविण मोरे , शिक्षणविस्तारधिकारी अरविंद दळवी, केंद्रप्रमुख शंकर बिरामणे, मुख्याध्यापिका जयश्री गायकवाड,सौ.स्वाती बारटक्के सर्व शिक्षक ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते
प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थी जीवनाचा पाया आहे.जावली तालुक्यात कुडाळ शाळा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर आहे.येथील विद्यार्थी अनेक क्षेत्रात चमकत आहेत.आजच्या गतिमान युगात विद्यार्थ्यांना संगणक उपयुक्त असून आपल्या गावातील विद्यार्थी यात कुठेही कमी पडू नयेत यासाठी कुडाळ येथील शिक्षणप्रेमी संदीप शिंदे व त्यांच्या फँटस्टिक सायकलिंग ग्रुपच्या दातृत्वातून कुडाळ प्राथमिक शाळेकरिता दहा संकणक व इतर साहित्य देण्यात आले आहे. याचा निश्चितच विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.यावेळी शाळेच्या वतीने बांसिधर राक्षे यांनी आभार मानले.