जावलीत आणखी तीन कोरोना पाँझिटीव्ह
June 27, 2020/

जावलीत आणखी तीन कोरोना पाँझिटीव्ह
एकूण ८९ ,बळी ८, अँक्टिव्ह ११
सूर्यकांत जोशी कुडाळ -शनिवारी रात्री उशीरा आलेल्या अहवाला नुसार जावली तालुक्यात रामवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष,५८ वर्षीय महिला व आखेगणी येथील ४२ वर्षीय पुरुष अशा तिघांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली आहे.
आज कोरोना बाधित गावात आखेगणीचा समावेश झाला आहे. तालुक्यात आता पर्यंत एकूण रुग्ण ८९, बळी ८,अँक्टिव्ह ११ तर ७० रुग्णांची कोरोना वर यशस्वी मात.
[the_ad id="4264"]