हुमगाव बावधन रस्त्याचे श्रेय फुकट लाटण्याचा प्रयत्न मानकुमरे यांनी करू नये – घाट रस्ता कृती समितीचे कार्य सर्वश्रुत – संदीप पवार

सूर्यकांत जोशी कुडाळ -नियोजित हुमगाव ते बावधन रस्त्याचा प्रकल्प हा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.स्थानिक जनतेसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी हुमगाव बावधन घाट रस्ता कृती समितीने मागील दोन वर्ष प्रामाणिक प्रयत्न केले, शासन दरबारी पाठपुरावा केला, त्याच्या सर्वेसाठी शासकीय निधी मंजूर करून घेतला त्याच्या अनुषंगाने घाटाचे दोनदा सर्वेक्षण बांधकाम खात्याच्या व वनखात्याच्या माध्यमातून पार पडले आता प्रस्ताव वनखात्याच्या कार्यालयात आहे कृती समितीच्या अथक मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळेच हा प्रकल्प प्रशासकीय मान्यतेपर्यंत पोहोचला. घाट रस्ता कृती समिती व नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात उत्तम समन्वय असून या विभागातील सर्वच विकास कामाबाबत चर्चा होत असते.तसेच या रस्त्यासाठी कृती समितीने केलेले कार्य सर्वश्रुत आहे.असे असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काहीजण नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत निवेदनाचा फार्स करून फोटोशेषण करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत . अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार यांनी प्रसिद्धी साठी दिले आहे. या सर्व प्रक्रियेत थेट सहभाग नसताना माजी जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी या प्रकल्पाचे श्रेय स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न न केवळ खेदजनक आहे, तर तो कृती समितीच्या परिश्रमांचा अनादर देखील आहे. मानकुंमरे यांना जर खरोखरच या प्रकल्पासाठी काही करता आले असते, तर त्यांनी कृती समितीच्या प्रयत्नांना हातभार लावायला हवा होता. मात्र, प्रत्यक्ष मदत न करता केवळ श्रेय घेण्याचा हा प्रकार राजकीय स्वार्थाचे दर्शन घडवतो. मागील आठ वर्ष त्यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये रस्ता पूर्णत्वाचे वचन दिले होते परंतु सदरचे वचन हे राजकीय पुढार्यांच्या आश्वासनासारखेच हवेत विरून गेलेले आहे या व्यक्तीने आठ वर्षात कोणत्याही प्रकारचा या रस्त्या करता प्रयत्न केलेले निदर्शनास आलेले नाही त्यांनी काही केले असेल तर त्यांनी या संदर्भात जाहीर करावेही बाब जनतेने लक्षात घेतली पाहिजे की, हा प्रकल्प मंजूर होण्यासाठी झटणारे खरे लोक कोण होते. अशा राजकीय नेत्यांनी श्रेय लाटण्याऐवजी उर्वरित कामात योगदान द्यावे, प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावेत. कृती समितीच्या अथक परिश्रमांवर पाणी फिरवणारे हे राजकारण थांबवून खऱ्या यशस्वी लोकांना मान्यता दिली पाहिजे. वसंतराव मानकुमरे यांच्यासारख्या नेत्यांनी असा चुकीचा संदेश न देता समाजासाठी सकारात्मक योगदान कसे द्यायचे, याचा विचार करायला हवा. आठ वर्ष शांत बसलेल्या स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोल्हे कुई करणाऱ्या पुढार्यांना जनता चांगलीच ओळखून आहे” घाट रस्ता कृती समिती व नामदार शिवेंद्रराजे भोसले बाबा महाराज यांच्यात उत्तम समन्वय असून या विभागातील सर्वच विकास कामाबाबत चर्चा होत असते अशा प्रसिद्धीसाठी हापापलेल्या काय बी कर्त्यांपासून लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे