बोंडारवाडी धरणाच्या ट्रायलपीटचे काम लवकरच


केळघर, ता:२७:गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बोंडारवाडी धरणाचे काम मार्गी लागण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील,अशी ग्वाही -अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ यांनी दिली.
केळघर ,मेढा विभागातील ५४ गावांसाठी बोनडार वाडी धरण हा कळीचा मुद्दा असून धरण कृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत आहे. याला यश आले असून कृती समितीच्या विनंतीची तातडीने दखल घेऊन अधिक्षक अभियंता श्री. मिसाळ यांनी सातारा येथे कृती समितीसोबत नुकतीच एक बैठक आयोजित केली होती.
कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांनी ट्रायल पिट चे काम जलसंपदा विभागाणे तातडीने करावे, अशी मागणी केली होती.त्यानुसार श्री. मिसाळ यांनी लवकरच ट्रायल पिट केली जाईल, असे आश्वासन यावेळी कृती समितीला दिले.मात्र प्रशासनाणे तातडीने ट्रायल पिट करावी, अशी मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आले.त्यानुसार श्री.मिसाळ यांनी ट्रायल पीट करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनाही आवश्यक निर्देश दिले. अधिक्षक अभियंता श्री.मिसाळ यांनी तातडीने दखल घेतल्याने बोंडारवाडी धरणाचे काम लवकरच मार्गी लागेल याची कृती समितीला खात्री आहे, असे निमंत्रक विजयराव मोकाशी यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस कार्यकारी अभियंता एम एस धुळे , उपअभियंता जे आर बर्गे, कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, श्रमिक जनता संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ ओंबळे व उद्योजक नारायणशेठ सुर्वे उपस्थित होते.यावेळी सातारा विभागात नव्याने हजर झालेल्या कार्यकारी अभियंता श्री. मिसाळ यांचे कृती समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले .