प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढी एकादशी यात्रा रद्द; महापूजे नंतर मंदिर बंद

प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढी एकादशी यात्रा रद्द; महापूजे नंतर मंदिर बंद
सूर्यकांत जोशीकुडाळ – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढी यात्रेसह अन्य सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली करहर येथे झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ठराविक मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टेन्सींग ठेवून सकाळी सातवाजता श्री विठ्ठल रखुमाई मूर्तींची महापूजा होईल.तसेच बेलोशी येथून फक्त चार लोक ह.भ.प.दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या पादुका करहर येथील मंदिरात घेऊन येतील. त्यानंतर मंदिर बंद करण्यात येईल.श्रींच्या दर्शनाची सोय आँनलाईन करण्यात आली आहे तरी भाविकांनी आँनलाईन दर्शन घ्यावे. मंदिर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. असे या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.